Header AD

एशियन पेंट्सतर्फे डिझाइन व सजावटीच्‍या अनुभवामध्‍ये वाढ सुरेख ते सानुकूल घटकांचा समावेश असलेल्‍या फर्निचर, फर्निशिंग्‍स व लायटिंग उत्‍पादनांची रेंज सादर
मुंबई   :  आज अधिकाधिक ग्राहकांची त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्त्वाला साजेसे असे स्‍वप्‍नवत घर असण्‍याची इच्‍छा आहे. पण हे आव्‍हानात्‍मक काम असण्‍यासोबत सर्वोत्तम दरांमध्‍ये घरगुती सजावटीच्‍या वस्‍तूंची खरेदी करणे आणि काहीतरी अनोखे व नवीन गोष्‍टींचा शोध घेणे देखील अवघड वाटते. ही गरज जाणून घेत एशियन पेंट्सने फर्निचर, फर्निशिंग्‍स व डेकोरेटिव्‍ह लायटिंगची त्‍यांची स्‍वत:ची रेंज सादर केली आहे, जी विविध ग्राहकांसाठी आकर्षक घरगुती सजावटीसाठी सोल्‍यूशन्‍सची रेंज देते. नवीन रेंज उच्‍च दर्जा, रेडी-मेड, तसेच सानुकूल डिझाइन पर्याय आकर्षक दरासह उपलब्‍ध असण्‍याचे वचन देते. ही उत्‍पादने निलया, रॉयल व अॅडॉर या तीन ब्रॅण्‍ड्स अंतर्गत डिझाइन व सजावट सोल्‍यूशन्‍सच्‍या नवीन रेंजसह उपलब्‍ध असतील. एशियन पेंट्सने त्‍यांचे डेकॉर स्‍टोअर्स, सेवा व वेबसाइटसाठी प्रमुख ओळख म्‍हणून 'ब्‍युटीफुल होम्‍स'ची देखील घोषणा केली. या ऑफरिंग्‍जच्‍या माध्‍यमातून, तसेच ग्राहकांमध्‍ये सजावटीसंदर्भात असलेल्‍या ट्रेण्‍ड्सबाबत करण्‍यात आलेल्‍या वर्षानुवर्षे संशोधनाच्‍या आधारावर एशियन पेंट्स घरगुती सजावटीसंदर्भात प्रत्‍येक गोष्‍टीसाठी अग्रणी एक-थांबा-स्रोत बनले आहे. 


एशियन पेंट्स डिझाइन वॉलपेपर्स, पेंट्स आणि किचन व बाथ कंपनीपलीकडे जात एकीकृत होम डेकॉर कंपनी बनण्‍याचा प्रयत्‍न करते. म्‍हणूनच या नवीन सादरीकरणासह एशियन पेंट्स आकर्षक किंमतीमध्‍ये प्रत्‍येक ग्राहकाला महत्त्वाकांक्षी अद्ययावत सुविधा देईल. तीन उत्‍पादन रेंजेसपैकी अॅडॉर हे ग्राहकांना वाजवी दरामध्‍ये आधुनिक व समकालीन उत्‍पादने उपलब्‍ध करून देणारे कलेक्‍शन आहे. रॉयल आकर्षक भक्‍कम लाकडी फर्निचर, सानुकूल अपहोल्‍स्‍टर्ड सोफा व सजावटीच्‍या दिव्‍यांच्‍या समान रेंजसह पेंट उत्‍पादनांचा लक्‍झरीअस विभाग म्‍हणून दीर्घकालीन वारसाला प्रशंसित करते. निलया हे अनोखे विशेष ऑफरिंग आहे, ज्‍यामध्‍ये आकर्षक व उत्तम कलाकृती असलेल्‍या अविरत डिझाइन्‍सचे कलेक्‍शन आहे. या तिन्‍ही ब्रॅण्‍ड्सची स्‍वत:ची आकर्षक फर्निचर, फर्निशिंग्‍स व लायटिंग रेंज असेल.  


या नवीन सादरीकरणाबाबत बोलताना एशियन पेंट्स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित सिंगल म्‍हणाले, ''लोकांचे घराशी भावनिक नाते जुडलेले असते आणि एशियन पेंट्स नेहमीच या गृहनिर्माण भावनेचा भाग राहिली आहे. एशियन पेंट्स नेहमीच भिंतींसाठी आकर्षक पेंट देण्‍याकरिता ओळखली जाते आणि घराच्‍या सजावटीचा भाग होण्‍यासाठी त्‍या दिशेने कार्य करत आली आहे. 


एशियन पेंट्सचे नवीन सादरीकरण एपी होम स्‍टोअर्स असलेल्‍या सर्व १० शहरांमध्‍ये आणि सॅटेलाइट टाऊन्‍ससह ब्‍युटिफुल होम्स सर्विस उपलब्‍ध असलेल्‍या सर्व नऊ बाजारपेठांमध्‍ये उपलब्‍ध असेल.
अधिक माहितीसाठी आणि व्‍हर्च्‍युअल टूरसाठी कृपया आमची वेबसाइट 
एशियन पेंट्सतर्फे डिझाइन व सजावटीच्‍या अनुभवामध्‍ये वाढ सुरेख ते सानुकूल घटकांचा समावेश असलेल्‍या फर्निचर, फर्निशिंग्‍स व लायटिंग उत्‍पादनांची रेंज सादर एशियन पेंट्सतर्फे डिझाइन व सजावटीच्‍या अनुभवामध्‍ये वाढ सुरेख ते सानुकूल घटकांचा समावेश असलेल्‍या फर्निचर, फर्निशिंग्‍स व लायटिंग उत्‍पादनांची रेंज सादर Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads