Header AD

कोरोनाचा काळात देखील पल्स पोलिओ लसीकरण बालकांसाठी आवश्यक - आयुक्त डॉ.पंकज आशिया


भिवंडी  : पल्स पोलिओ लसीकरण मोहिम बालकांसाठी अतिशय आवश्यक आहे. कोरोनाच्या काळांमध्ये त्याची  अधिक आवश्यकता आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत  लसीकरण टाळू नका. प्रत्येक 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पल्स पोलिओ द्या. असे उद्गार पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया यांनी काढले. सन 2020 या वर्षातील पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची  सुरुवात आयुक्त पंकज आशिया यांच्या हस्ते स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात करण्यात आली, त्यावेळी आयुक्त पंकज आशिया बोलत होते. यावेळी पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन मोकाशी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बुशरा सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयवंत धुळे, जागतिक आरोग्य संघटनेचे भिवंडीचे समन्वयक डॉक्टर किशोर चव्हाण, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले उपस्थित होते.


पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया पुढे म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत  शून्य  ते पाच वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षापासून पल्स पोलिओ मोहीम चांगल्या प्रकारे या शहरात राबवण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करावयाची आहे. आज व या पुढील पाच दिवस 21 ते 25 तारखेच्या दरम्यान वैद्यकीय विभागाकडील पथक कर्मचारी आपल्या घराघरात पोलिओ लसीकरण करता येणार आहेत. त्यावेळी या वैद्यकीय विभागातील पथकाला सहकार्य करावे व आपल्या घरातील सर्व पाच वर्ष पर्यंतच्या  मुलांना  पल्स पोलिओ लस देण्यात यावी. पल्स  पोलिओ उपक्रमाबरोबरच माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेची देखील माहिती देण्यात आली. याबाबत आयुक्त यांनी सर्व उपस्थितांना माझे कुटुंब माझी जबाबदारी या बाबत प्रतिज्ञा देखील दिली. शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे असे आवाहन देखील पालिका आयुक्त पंकज आशिया यांनी या  प्रसंगी केले. पालिका आयुक्त यांच्या हस्ते पाच लहान मुलांना पोलिओ लस देण्यात आली. यावेळी पालिका आयुक्त यांनी सर्व इंदिरा गांधी रुग्णालयाची व कोविड रुग्णालयाची पाहणी केली.

कोरोनाचा काळात देखील पल्स पोलिओ लसीकरण बालकांसाठी आवश्यक - आयुक्त डॉ.पंकज आशिया कोरोनाचा काळात देखील पल्स पोलिओ लसीकरण बालकांसाठी आवश्यक  - आयुक्त डॉ.पंकज आशिया Reviewed by News1 Marathi on September 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads