Header AD

लाचखोर संजय घरत यांच्या परतीचा मार्ग खडतरच निलंबन आढावा समितीचा अहवाल गुलदस्त्यात


कल्याण  |  कुणाल म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील लाच खोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत सहा अन्य अकरा   निलंबित अधिकारि कर्मचाऱयांना सेवेत घेण्याचा बाबतच्या प्रशासकीय प्रस्तावावर बुधवारी निलंबन आढावा समितीच्या बैठक  आयोजित केली होती. या आढावा बैठकीच्य निर्णयाकडे संपूर्ण  पालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. 

तब्बल एक तास चाललेल्या आढावा समित्या सात सदस्यीय समितीच्या बैठकीत  अकरा निलंबीत अधिकाऱयांच्या निलंबनाच्या परतीच्या प्रस्तावा वर  निर्णय घेण्यात आला असून प्रोसिंडिंग फायनल तयार झाल्यावर प्रोसिडिंग कळवू अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱयांनी दिली. त्यामुळे तुर्तास तरी निलंबित अधिकाऱयांच्या परतीचा निर्णय गुलदस्त्यातच  ठेवण्यात आला आल्याने लाचखोर अधिकारी संजय घरत यांच्या परतीचा मार्ग अधिकच खडतर बनला आहे.

      कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील निलंबित असलेल्या अकरा अधिकारी व कर्मचाऱयांच्या निलंबनाच्या परतीचा  प्रशासकीय प्रस्ताव प्रशासनाने निलंबन आढावा समितीच्या पटलावर बैठकीत ठेवण्यात आला होता.निलंबन आढावा समिती मध्ये पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त , उपायुक्त, सहाय्यक उपायुक्त ,अन्य दोन वरिष्ठ अधिकारी यांच्या सह एसीबीचे अधिकारी अश्या सात सदस्यांची समिती आहे. नियोजन आढावा समिती मध्ये पालिका आयुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. 

बुधवारी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकी कडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. अकरा निलंबित अधिकार्याच्या परतीच्या प्रस्तावात पालिकेतील लाचखोर तात्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्या निलंबनाचा परतीचा प्रस्तावात समावेश असल्याने समितीच्या निर्णया कडे  सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.आयुक्त दालनात पार पडलेल्या आढावा समितीच्या बैठकीत निलंबित अधिकाऱयांच्या परतीच्या प्रस्तावा बाबत तब्बल एक सव्वा तास सखोल चर्चा करण्यात आली. 


या बैठकीत समितीने काय निर्णय  घेण्यात आला या बाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला असला निलंबन आढावा समितीच्या बैठकीत निलंबित अधिकार्याच्या परतीच्या प्रस्तावा वर समितीने निर्णय घेण्यात आला असला तरी प्रोसिंडिंग फायनल  झाले नसल्याने प्रोसिंडिंग फायनल तयार झाल्यावर कळविण्यात येईल अशी माहित दिली. त्यामुळे तूर्तास तरी निलंबीत अधिकाऱयांच्या परतीचा निर्णय गुलदस्त्यात राहिला असून लाचखोर संजय घरत यांच्या परतीचा मार्ग खडतर बनला आहे.
लाचखोर संजय घरत यांच्या परतीचा मार्ग खडतरच निलंबन आढावा समितीचा अहवाल गुलदस्त्यात लाचखोर संजय घरत यांच्या परतीचा मार्ग खडतरच निलंबन आढावा समितीचा अहवाल गुलदस्त्यात Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads