Header AD

आरोग्य सुविधांची वानवा असतानाही दिव्यातील जनतेच्या संयम आणि शिस्तीमुळेच दिव्यात कोरोना नियंत्रणात रोहिदास मुंडे


दिवा  |  प्रतिनिधी   :-  आरोग्य सुविधांची वानवा असतानाही दिव्यातील जनतेच्या संयम आणि शिस्तीमुळेच दिव्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहरजिल्हा कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे यांनी व्यक्त केले आहे.


अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि चार लाख लोकसंख्या असणाऱ्या दिवा शहरात एकही मोठे हॉस्पिटल किंवा पालिका रुग्णालय नसताना ही दिव्यातील नागरिकांना या आधी जशी स्वतःची लढाई स्वतः लढली आहे तशीच लढाई कोरोना काळातही दिवावासीयांनी एकजुटीने व जिद्दीने लढल्याने शहरातील कोरोना संकट नियंत्रणात असल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.


कोरोना नियंत्रण मध्ये आणण्यासाठी जसे पालिका प्रशासन,केंद्र व राज्य सरकार,कोरोना योद्धा यांचे योगदान आहे तितकेच योगदान दिवा शहरातील नागरिकांचे आहे,कारण मागील 25 वर्षे दिव्याच्या आरोग्य व्यवस्थेकडे सरकारी यंत्रणेने दुर्लक्ष केले असतानाही व सध्यस्थीती मध्येही कोणत्याही ठोस उपाययोजना नसताना ही दिव्यातील नागरिक स्वतःच्या हिमतीवर आरोग्याची लढाई लढत आहेत या नागरिकांचे कौतुक करायलाच हवे असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

 

आरोग्य सुविधांची वानवा असतानाही दिव्यातील जनतेच्या संयम आणि शिस्तीमुळेच दिव्यात कोरोना नियंत्रणात रोहिदास मुंडे आरोग्य सुविधांची वानवा असतानाही दिव्यातील जनतेच्या संयम आणि शिस्तीमुळेच दिव्यात कोरोना नियंत्रणात  रोहिदास मुंडे Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads