Header AD

युवकांनी कोरोना नंतरच्या काळात सामाजिक योगदान देणे गरजेचे


◆ भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांचे आवाहन आदर्श शैक्षणिक समूहपनवेल आयोजित ऑनलाइन चर्चा संपन्न....


कल्याण | कुणाल  म्हात्रे  : कोरोनाचा काळ हा एकीकडे संकट असताना एका बाजूला आपल्याला बरंच काही शिकवून गेला आहे. देशात आणि समाजात नेमकं महत्वाचं काय आहेकशाला महत्व दिले पाहिजे हेसुद्धा आता शासन आणि प्रशासनाच्या लक्षात आले आहे. वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात हव्यातडॉक्टर,परिचारिका आणि कोरोना योद्धे म्हणून आपले योगदान देणारे सर्वच घटक या काळात धाडसाने माणुसकी जपताना दिसले. येणाऱ्या कोरोना नंतरच्या काळात युवक म्हणून आपण सक्रियपणे सामाजिक योगदान दिले पाहिजे असे मत भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी बोलताना केले.


आदर्श शैक्षणिक समूहपनवेल आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती व शिक्षणमहर्षी बापूसाहेब डी. डी. विसपुते उर्फ ऋषीमहाराज यांच्या ५ व्या स्मृतिदिनानिमित्त" कोरोना नंतरची युवकांची भूमिका... एक नवे पर्व" या विषयांवर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची उजळणी यावेळी केली.
कोरोनाच्या काळामध्ये स्थलांतरित मजूरसामान्य व्यक्ती आणि कष्टकरी समाजाचे प्रचंड हाल आणि नुकसान झाले आहे. समाजामध्ये या सर्व घटकांचे मोठे योगदान आहे. यानंतरच्या काळात ज्यांनी ज्यांनी कोरोनामध्ये काम केलेसामाजिक जबाबदारी पार पाडली त्यांना विसरू नका. आपण अभिनेत्यांना हिरोनायक म्हणतो मात्र अभिनेता हा भूमिका करत असतोखरे नायक आणि हिरो तर समाजासाठी अविरतपणे कार्यरत असतात. पोलीसडॉक्टरपरिचारिकास्वच्छता कर्मचारी असे कोरोना योद्धे हे खरे हिरो आहेत.


युवकांनीही आपल्या आपल्या ठिकाणी समाजासाठी काम करून नायकहिरो होण्याचा प्रयत्न करा. आपण समाजाचे देणे लागतो यानुसार आपले योगदान द्या. युवकांची भूमिका महत्त्वाची आहे कारण युवक हा देशाचाच मुख्य आधार आहेऑनलाइन गेमिंगमागे धावत न जाता चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा असेही आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पुढे बोलताना केले. यावेळी आदर्श शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष धनराज विसपुतेआदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र विसपुतेडॉ. सीमा कांबळे आदी पदाधिकारीप्राध्यापकशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

युवकांनी कोरोना नंतरच्या काळात सामाजिक योगदान देणे गरजेचे युवकांनी कोरोना नंतरच्या काळात सामाजिक योगदान देणे गरजेचे Reviewed by News1 Marathi on September 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads