Header AD

कुणाल पाटील फाउंडेशनच्या वतीने जनधन बँक योजनेचा शुभारंभ


 ◆ शून्य बॅलन्स जनधन खाते उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

कल्याण | कुणाल म्हात्रे  :  कल्याण पूर्वेतील नागरिकांच्या सोयीसाठी कुणाल पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "जनधन बँक खाते" या शिबीराला कल्याण पूर्वेतील कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात सुरवात झाली आहे.

शून्य बॅलन्स खाते उघडण्यासाठी नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, हे रविवार पर्यंत  सुरु राहणार आहे.  ज्या नागरिकांनी आतापर्यंत जनधन खाते उघडले नाही, अशा सर्वसामान्य व मध्यमवर्गीय लोकांसाठी बँकेची प्रक्रिया सोपी व्हावी या उद्देशाने नगरसेवक कुणाल पाटील यांनी शिबीराचे आयोजन केले आहे. या खात्या अंतर्गत नागरिकांना पासबुक२ लाखांचा अपघाती विमा व  खाते आयकार्ड मिळणार असून,खाते उघडण्याकरिता फक्त २ पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड व पॅनकार्ड इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत ग्राहक सरकारी बँकांप्रमाणेचखासगी बँकांमध्येही जनधन अकाऊंट सुरु करु शकतात. जनधन खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याजाची सुविधा असून खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते. जनधन खातेधारक आपल्या खात्यातून १० हजार रुपयांचं ओवरड्राफ्ट करु शकतो. म्हणजे खात्यात पैसे नसतानाही १० हजार रुपये काढता येऊ शकतात. परंतु ही सुविधा खातं सुरु केल्यानंतर काही महिन्यांनंतरच मिळते. या जनधन खात्याद्वारे निशुल्क दोन लाख रुपयांचा अपघाती विमादेखील मिळतो. यात ३० हजारांचाही विमा मिळू शकतो. खातेधारकाच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या नॉमिनीला ही रक्कम मिळू शकते.

 या खात्यात कोणताही मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु चेकबुकची सुविधा घेतल्यास मिनिमम बॅलेन्स ठेवणं गरजेचं आहे. भारतात राहणारा १०  वर्षांवरील कोणताही नागरिक जनधन खातं सुरु करु शकतो. असे  विविध फायदे असलेल्या या जनधन बँक योजनेच्या अंतर्गत खाते उघडण्याचे शिबीर कुणाल पाटील यांनी सुरु केले आहे. यावेळी तलाठी कुमावत, जीवन मढवी, समाजसेवक अनिल पाटील, महेंद्र तरे, भारत सोनावणे, सचिन माने आदी जण उपस्थित होते.    

कुणाल पाटील फाउंडेशनच्या वतीने जनधन बँक योजनेचा शुभारंभ कुणाल पाटील फाउंडेशनच्या वतीने जनधन बँक योजनेचा शुभारंभ Reviewed by News1 Marathi on September 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads