Header AD

आयटीसी लिमिटेडच्या सनफिस्ट यिप्पी ! च्या १०व्या वर्धापनदिना निमित्ता गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सला® गवसणीभारतातील नूडल्सच्या चाहत्यांसाठी हा एक खरोखर यिप्पी ! क्षण असणार आहे. कारण २८९४ लोकांनी एकत्र येऊन एकमेवाद्वितीय असा विश्वविक्रम केला. नूडल्स खाणाऱ्या व्यक्तींचे एका तासात सर्वाधिक फोटो फेसबुकवर अपलोड करण्यात आले.


भारत  :   सनफिस्ट यिप्पी ! या भारतातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट नूडल्सच्या ब्रँडने ग्राहकांनी त्यांच्या यिप्पी च्या बाऊलप्रती व्यक्त केलेल्या चिरंतन प्रेमासह त्यांचा १० वा वर्धापन दिन साजरा केला. विशिष्ट प्रकारच्या लांब आणि नॉन-स्टिकी नूडल्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या ब्रँडने आपल्या ग्राहकांना त्यांचा यिप्पी नूडल्सचा आस्वाद घेण्याचा अनुभव कॅप्चर करण्यासाठी व शेअर करण्यासाठी फेसबुक इव्हेंट पेजवर निमंत्रित केले. या वेळी ही गंमतजंमत आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेली अॅक्टिव्हिटी करत नूडल्स खाणाऱ्या व्यक्तींचे एका तासात फेसबुकवर अपलोड केलेले सर्वाधिक फोटो हा विक्रम साध्य करण्यात आला. सर्व सहभागींना या अॅक्टिव्हिटीची आठवण म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि सनफिस्ट यिप्पी !तर्फे सहभागाबद्दल औपचारिक पत्र प्राप्त होणार आहे.


या प्रसंगी आणि उद्दिष्टपूर्तीबद्दल विस्तृत माहिती देताना आयटीसी लि.च्या फुड्स विभागाचे विभागीय मुख्य कार्यकारी श्री. हेमंत मलिक म्हणाले, “२०१० साली सुरुवात झाल्यापासूनच कामे अधिक चांगल्या पद्धतीने करणे हा यिप्पी !चा गाभा राहिला आहे. त्यामुळेच ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या नूडल्स ब्रँड मिळण्याचा मार्ग सुलभ झाला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये केलेल्या विक्रमाने भारताचे सनफिस्ट यिप्पी !वरील प्रेम प्रतिबिंबीत झाले आणि जगभरातील लोकांना आम्ही भारतीयांचे नूडल्सप्रेम दाखवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. 


सर्व वयोगटांतील ग्राहकांपर्यंत आपल्या लांब व न चिकटणाऱ्या नूडल्स पोहोचविण्यासाठी आणि वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये त्यांचा विस्तार करण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातील यिप्पी !ने महेंद्र सिंग धोनीची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. 

आयटीसी लिमिटेडच्या सनफिस्ट यिप्पी ! च्या १०व्या वर्धापनदिना निमित्ता गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सला® गवसणी आयटीसी लिमिटेडच्या सनफिस्ट यिप्पी ! च्या १०व्या वर्धापनदिना  निमित्ता गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सला® गवसणी Reviewed by News1 Marathi on September 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads