Header AD

बॅकस्टेज कलाकारांना एक महिन्याच्या अन्नधान्य किटचे वाटप


◆ सी एन पाटील फाऊंडेशन आरएसपी शिक्षक अधिकारी व कल्याण सामाजिक संस्थेचा उपक्रम...

कल्याण  | कुुुणाल  म्हात्रे  : चित्रपटनाट्य व मालिका तसेच इतर विभागातील बॅकस्टेज कलाकारांवर मागील पाच महिन्यांपासून कोरोना महामारी सारख्या आपत्कालीन परिस्थितीत उपासमारीची वेळ आल्याने सी एन पाटील फाऊंडेशन कल्याणकल्याण सामाजिक संस्था व आर एस पी अधिकारी शिक्षक कल्याण-डोंबिवली युनिट आणि समाजसेवक सुरेश धडके यांनी मदत म्हणून ७० कुटुंबांना एक महिन्याचे रेशन वाटप केले. हा कार्यक्रम सिद्धिविनायक गार्डन हॉल भोइरवाडी,कल्याण येथे पार पडला.

चंद्रशेखर पाटील यांनी सांगितले की गेल्या पाच महिन्यापासून अशा अनेक गरजू व गरजवंत कुटुंबांना अन्नधान्य वाटप व गरजेच्या वस्तू वेगवेगळ्या माध्यमातून देण्यात आल्या. या कामी त्यांना त्यांचे संस्था पदाधिकारी वैशाली परदेशीसुधाकर पाटीलसंदेश परदेशीलिओ क्लबचे पूर्वेश गाडा व समाजसेवक सुरेश धडके यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले.

आर एस पी प्रसिद्धीप्रमुख अनिल बोरनारे यांनी आर एस पी युनिट वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने  हे सेवाभावी कार्य सतत करत आहेत हे सांगितले. अनेक गरजू शिक्षकांनासुद्धा अन्नधान्य वाटप वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आले. कल्याण-डोंबिवली युनिटचे प्रमुख मनिलाल शिंपी यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून  गरजवंत कुटुंबांना अन्नधान्य वाटप केले.

यावेळी चंद्रशेखर पाटील, टीव्ही व चित्रपट कलावंत कोमल आवळे, मराठी बाणा फेम विद्या वाघमारे, आर एस पी अधिकारी शिक्षक कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली युनिटचे कमांडर व ठाणे जिल्हा उपकमांडर मनिलाल शिंपी, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख अनिल बोरनारे, कल्याणमधील समाजसेवक शिवाजी शिंदे हे ही उपस्थित होते.

बॅकस्टेज कलाकारांना एक महिन्याच्या अन्नधान्य किटचे वाटप बॅकस्टेज कलाकारांना एक महिन्याच्या अन्नधान्य किटचे वाटप Reviewed by News1 Marathi on September 14, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads