Header AD

१०६ वर्षाच्या आनंदीबाई पाटील यांनी केली कोरिना मात



डोंबिवली   |   शंकर जाधव   :   १०६ वर्षाच्या आनंदीबाई पाटील यांना कोरोनाची   बाधा झाल्यानंतर त्यांच्या वयामुळे अनेक रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली. परंतु डोंबिवली येथील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील,  कोविड समर्पित रुग्णालयातील डॉ. राहुल घुले यांनी त्यांना तिथे दाखल करून घेतले आणि रविवारी  उपचाराअंती, आनंदीबाई पाटील या कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यास वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला. त्यामुळे कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अथकपणे काम करणारे महापालिका प्रशासन,  डॉ. राहुल घुले  यांचेवर सर्वच स्तरातुन अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.


कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले असताना १०६ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेस कोरोनामुक्त होऊन डिसचार्ज मिळणे ही  सकारात्मक आणि समाधान कारक बाब आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करून महापालिका प्रशासन व डॉ. राहुल घुले यांचे कौतुक केले आहे.
१०६ वर्षाच्या आनंदीबाई पाटील यांनी केली कोरिना मात १०६ वर्षाच्या आनंदीबाई पाटील यांनी केली कोरिना मात Reviewed by News1 Marathi on September 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १९७ नवे रुग्ण तर २ मृत्यू

  ■५३ , ९५७  एकूण रुग्ण तर १० ५९  जणांचा आता पर्यंत मृत्यू  तर २४ तासांत   १७५  रुग्णांना डिस्चार्ज... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण ...

Post AD

home ads