Header AD

कुकु एफएमची शेमारू सोबत भागीदारीयूझर्सना विशेष कंटेंट प्रदान करण्यासाठी आले एकत्र...


मुंबई  : भारतातील उदयोन्मुख पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म कुकू एफएम आणि हिंदी भाषेतील प्रख्यात एंटरटेनमेंट कंपनी शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेड, या त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विशेष कंटेंट प्रदान करण्यासाठी भागीदारी करीत आहेत. या भागीदारीद्वारे, कुकु एफएम आपल्या यूझर्ससाठी ऑडिओ कंटेंटमध्ये वैविध्य आणत आहे. त्यांना शेमारू टीव्हीवरील लोकप्रिय आणि मनोरंजक कंटेंट ऑडिओ स्वरुपात मिळण्याची संधी प्रदान करेल. मनोरंजन क्षेत्रातील अग्रेसर म्हणून, शेमारूने अनेक वर्षांमध्ये विविध शैलींमध्ये कंटेंट तयार केले आहे.


या प्लॅटफॉर्मवरील शेमारू चॅनलच्या कंटेंटमध्ये आध्यात्मिक प्रवचनांचा समावेश आहे. यात गौरांग प्रभू, ओम स्वामी, राधानाथ स्वामी यांच्यासारख्या प्रसिद्ध गुरुंचे प्रवचन असून, पवित्र हिंदू धार्मिक ग्रंथ भगवद गीतेचे हिंदी भाषेतील ८ पेक्षा जास्त तासांचे १० ऑडिओ एपिसोड्स आहेत. यासोबतच, इतर महान संग्रहात यूझर्सना सकाळची उत्तम सुरुवात करण्यासाठी जप, मंत्र, सकाळची आरती आणि हनुमान चालीसा इत्यादींचा समावेश आहे.


कुकु एफएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह संस्थापक लालचंद बिसू म्हणाले, “ शेमारूसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. सध्याच्या काळात आमच्या यूझर्सना जीवन संतुलित तसेच शांततापूर्ण करण्याची गरज आहे. आणि शेमारूदेखील आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाची आणि किफायतशीर सेवा प्रदान करण्याच्या दिशेने प्रयत्नरत आहे.”

कुकु एफएमकडे १५ पेक्षा जास्त शैलींमध्ये सामग्री असून, यूझर्स अध्यात्म, हिंदूत्व, शिक्षण, चित्रपट, प्रेम, ध्यान आणि इतर प्रवाहांतील कंटेंट निवडू शकतात. यूझर्ससाठी शेमारू नियमितपणे कंटेंट अपलोड करेल, जेणेकरून त्यांनी तयार केलेल्या भरपूर कंटेंटचा ते आनंद घेऊ शकतील.

कुकु एफएमची शेमारू सोबत भागीदारी कुकु एफएमची शेमारू सोबत भागीदारी Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads