Header AD

तळोजा खारघरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार - पालकमंत्री आदिती तटकरे

 ◆ राष्ट्रवादीच्या जिल्हा शिष्टमंडळाला दिले आश्वासन...


कल्याण   | कुणाल  म्हात्रे  :   झपाट्याने नागरीकरण झालेल्या तळोजा खारघर परिसरात नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत असून याबाबत  येथील पनवेल जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर तळोजा खारघरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अदिती तटकरे यांनी दिले.

तळोजा व खारघर याठिकाणी पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. सदर पाणीपुरवठ्याची जबाबदारी सिडको प्रशासनाकडे आहे. एमआयडीसीकडून दररोज आठ एम एल टी पाणी या विभागासाठी सिडको प्रशासनाला दिले जावे. सिडको व एमआयडीसी  मध्ये झालेल्या असे बाल्टर करारानुसार ठरले आहे. असे सिडको  प्रशासकीय अधिकारी यांचे म्हणणे आहे. परंतु एमआयडीसीकडून रोज सहा ते  सात एम एल टी च पाणी  सदर विभागाला दिले जाते. ते देखील फार कमी दाबात दिले जात असल्यामुळे विभागातील अनेक बिल्डींगना आठवड्यातील कित्येक दिवस पाणी मिळत नाही. जनता सिडकोला पाणी बिल भरत असल्यामुळे सिडकोला याबाबत जाब विचारला असता एमआयडीसीकडून पुरेसे पाणी पुरवले जात नसल्याची सबब सांगितली जाते.

ही सर्व व्यथा घेऊन पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहसचिव प्रसाद पाटील व पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मंगेश नेरूळकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ प्रथम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पनवेल शहर जिल्हा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कार्यकारी अध्यक्ष शिवदास कांबळे  आणि  महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव संदीप म्हात्रे यांना भेटले. त्यांचे मार्गदर्शन घेऊन आज पालकमंत्री आदिती तटकरे यांना ही व्यथा मांडली. हा प्रश्न समजावून घेऊन आदिती तटकरे यांनी  सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील व कार्याध्यक्ष  शिवदास  कांबळे यांच्यासमवेत बैठक लावून लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिष्टमंडळात दिले. 

या शिष्टमंडळात पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे कार्याध्यक्ष मंगेश नेरुळकर,  ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब लबडेपनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आर एन यादवजिल्हा सहसचिव कृष्णा मर्ढेकरराष्ट्रवादी काँग्रेस खारघर विभागीय अध्यक्ष सुरेश रांजवन,  महेश राऊत व प्रदीप पाटील आदी पदाधिकारी होते.

तळोजा खारघरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार - पालकमंत्री आदिती तटकरे तळोजा खारघरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणार - पालकमंत्री आदिती तटकरे Reviewed by News1 Marathi on September 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads