Header AD

बंजारा समाजाच्या गोरबोली भाषेचा घटनेच्या भारतीय मातृ भाषेच्या अनुसूचित समावेश करण्याची खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांची मागणी




डोंबिवली  |  प्रतिनिधी   :  साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा असलेल्या गोरमाटी (बंजारा) समजाच्या गोर बोली भाषेचा भारतीय घटनेच्या मातृ भाषेच्या ८ व्या अनुसूचित समावेश करावा, अशी आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली.


गोरमाटी (बंजारा) समाज हा मूळ या देशाचा असून जगात सुंदर वैभवशाली संस्कृती असलेल्या समाजाचे देशातील प्रत्येक राज्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. भारतात १० कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला हा समाज महाराष्ट्र (९० लाख लोकसंख्या), तेलंगणा (२ कोटी), कर्नाटक (१.२५ कोटी), आंध्रप्रदेश (७० लाख), उत्तरप्रदेश (३० लाख), राज्यस्थान, गोवा, मध्यप्रदेश व इतर अनेक राज्यांमध्ये विखुरलेला आहे. त्यामुळे बंजारा (गोरबोली) भाषा देशात मोठया प्रमाणात बोलली जाते. त्यांच्या ‘गोरबोली’ भाषेची लिपी नसल्याने त्यांचा इतिहास तोंडी परंपरेद्वारे जिवंत राहतो.


या समुदायाची प्राचीन संस्कृती आणि वारसा आणि भाषेला स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात घटनेनुसार मान्यता मिळाली नाही.तसेच, साहित्य अकादमीने बऱ्याच प्रमाणात साहित्य आणि पुस्तके गोरबोली भाषेत लिहिली आहेत आणि त्यांचा इतिहास नोंदवून त्यांची भाषा आणि तोंडी परंपरा जपण्याची गरज आहे. 


आपल्याकडे बंजारा भाषा ही सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनातील परिप्रेक्षात पाहिली पाहिजे, असे प्रतिपादन करून  घटनेच्या ८ व्या अनुसूचीमध्ये या गोष्टींचा समावेश करुन गोरबोली (बंजारा) भाषा विकसित व्हावी म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.


बंजारा भाषा (गोरबोली) ला मान्यता मिळावी म्हणून मागील अनेक वर्षापासून मागणी करत आहे; यापूर्वी राज्य सरकारने २०१९ मध्ये केंद्र सरकारकडे शिफारस देखील केली होती, परंतु आज पर्यंत या भाषेस राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला नाही. याची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे अखेर संसद नियम ३७७ अंतर्गत खा.डॉ.शिंदे यांनी संसदेत मागणी केली.


बंजारा समाजाच्या गोरबोली भाषेचा घटनेच्या भारतीय मातृ भाषेच्या अनुसूचित समावेश करण्याची खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांची मागणी बंजारा समाजाच्या गोरबोली भाषेचा घटनेच्या भारतीय मातृ भाषेच्या अनुसूचित समावेश करण्याची खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांची मागणी Reviewed by News1 Marathi on September 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads