Header AD

ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार



ठाणे  | प्रतिनिधी  :  ठाणे महानगरपालिकेच्या घोड़बंदर विभागात पाणी पुरवठा करणा-या 1158 मीमी व्यासाच्या जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन मेट्रोच्या कामासाठी स्थलांतरीत करणे तसेच साकेत येथील मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हचे दुरुस्तीचे काम करणे, बाळकुम जलकुंभाच्या इनलेट वाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलणे तसेच सोहम संप येथे नवीन विद्युत पॅनल बसविणे या कामाकरीता ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेमधून व स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा  पाणी पुरवठा 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे.  

उपरोक्त कामासाठी शुक्रवार, दिनांक 18 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 9.00 ते शनिवार, दिनांक 19 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत (24 तास) घोड़बंदर रोड़, पातलीपाड़ा, पवार नगर, कोठारी कम्पाऊन्ड़, गांधी नगर, जॉन्सन, इटर्निटी, समतानगर, इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, मुंब्रा रेतीबंदर, कळव्याचा काही भाग इत्यादी भागात पाणी पुरवठा बंद राहील. 


या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार ठाणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार Reviewed by News1 Marathi on September 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads