Header AD

भारतामध्ये प्रथमच, मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटल मध्ये चाळीस वर्षीय महिलेच्या प्रसूती समयी सी सेक्शनच्या दरम्यान ब्रेन ट्यूमवर डिकम्प्रेशन क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलीगरोदरपणाच्या तिस-या तिमाहीमध्ये महिलेला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले होते ....


मुलुंड  :  मुलुंड येथे राहणा-या श्रीम. लावी सोचर आपल्या दुस-या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. गरोदरपणाच्या तिस-या तिमाहीपर्यंत माता आणि बाळ दोघांचीही प्रगती उत्तम होती व दोघांच्या तब्येतीही चांगल्या होत्या, मात्र तिसरी तिमाही सुरू झाल्या झाल्या श्रीम. लावी सोचर यांना आपल्या शरीराची उजवी बाजू अशक्त झाल्याचे जाणवू लागले. त्यांना उजवा हात उचलता येईना किंवा उजवा पाय हलवता येईना. श्रीम. सोचर गरोदरपणाच्या काळातील नियमित तपासणीसाठी मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील सल्लागार प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अतुल गणात्रा यांच्याकडे जात होत्या. आपल्या या नव्या दुखण्यामुळे आपल्याला किंवा पोटातील बाळाला काही धोका असेल का, या भीतीने त्यांनी डॉ. गणात्रा यांचा सल्ला घेतला. 


श्रीम. सोचर यांच्या तब्येतीची पाहणी केल्यानंतर डॉ. अतुल गणात्रा यांनी त्यांना मुलुंड येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील सल्लागार डॉ. राजेश बेन्नी यांच्याकडे पाठवले. डॉक्टरांच्या सल्ल्यावरून एमआरआय चाचणी करून घेतल्यानंतर रुग्णाला मेनिन्जिओमा (एक प्रकारचा ब्रेन ट्यूमर) असल्याचे आढळून आले. त्यामुळे रुग्णाला फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड येथील न्यूरो सर्जरी विभागाचे सीनिअर कन्सल्टन्ट डॉ. अजय बजाज यांच्याकडे न्यूरोलॉजिकल तपासणीसाठी पाठविण्यात आले. या स्थितीमध्ये कवटीच्या आत असलेल्या मेंदू व मणक्याच्या भागाला आच्छादणा-या अंत:पटलावर ट्यूमर तयार होतो. 


अशावेळी गर्भारपणाची स्थिती लक्षात घेता कोणकोणती काळजी घ्यायची याबद्दल डॉ. गणात्रा आणि डॉ. बजाज या दोघांनी मिळून श्रीम. सोचर यांना खबरदारीच्या सूचना दिल्या. मात्र काही दिवसांतच त्यांची स्थिती खालावू लागली व त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले गेले. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉ. बजाज आणि डॉ. गणात्रा यांनी त्यांच्या तब्येतीची तपासणी केली तेव्हा ट्यूमरमुळे कवटीच्या आतील भागातील दाब खूपच वाढल्याचे व रुग्णाच्या एका डोळ्यातील बाहुली विस्फारल्याचे आढळून आले. त्यांना तत्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये हलविण्यात आले. 


स्थितीचे मूल्यमापन केल्यानंतर तत्काळ प्रसूती करण्याचा व त्याचवेळी मेंदूवरील दाब काढून टाकण्यासाठी डिकम्प्रेशन प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. गणात्रा आणि डॉ. बजाज यांनी एकमेकांशी अचूक मेळ साधत या शस्त्रक्रिया पार पाडल्या. प्रसूती पार पडली तसेच मातेची तब्येतही स्थिर होती. प्रसूतीनंतर दोन दिवसांनी मातेचा रक्तदाब स्थिर झाल्यानंतर त्यांच्यावर ट्यूमर काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. नवमातेला प्रसूतीनंतर ७-८ दिवसांनंतर डिस्चार्ज देण्यात आला. 


या शस्त्रक्रियेबद्दल बोलताना मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या न्यूरो सर्जरी विभागाचे वरीष्ठ सल्लागार डॉ. अजय बजाज म्हणाले, ''भारतामध्ये सी-सेक्शनची शस्त्रक्रिया व ब्रेन ट्यूमरसाठीची डिकम्प्रेशन क्रॅनिओटॉमी एकाच वेळी केली जाण्याची घटना यापूर्वी कधीही घडलेली नाही. या शस्त्रक्रियेमध्ये कवटीच्या आतल्या भागावर येणारा दाब कमी करण्यासाठी कवटीचा काही भाग काढून टाकला जातो. विशेषत: या रुग्णाच्या बाबतीत आम्ही ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले, कारण माता आणि बालक दोघांनाही वाचविण्याचे लक्ष्य आमच्यासमोर होते. वेळच्यावेळी हस्तक्षेप केल्यामुळेही हे लक्ष्य साध्य करण्यास मदत झाली. फॉलो-अप्सनंतर आई आणि बाळ दोघांचीही तब्येत उत्तम असल्याचे पाहून आमच्या मनावरचे दडपण उतरले आहे.'' 


आपले दुसरे बाळ आणि पत्नी यांचे प्राण वाचल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना श्री. अमित सोचर म्हणाले, ''माझी पत्नी आणि बाळ यांचे प्राण वाचविण्यास मदत करणारी शस्त्रक्रिया पार पाडणा-या दोन्ही डॉक्टर्स तसेच नर्सिंग टीमचा मी आभारी आहे. एका आठवड्यानंतर ते फॉलो-अपसाठी पुन्हा येतील तेव्हा अधिक माहिती देता येईल.''


नवमाता आणि बाळाच्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलताना मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलचे सल्लागार प्रसूती स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अतुल गणात्रा म्हणाले, ''आई आणि बाळ दोघांचीही तब्येत उत्तम आहे आणि त्यांना फॉलो-अपसाठी येण्याचा सल्ला देण्यात आला आहे. गरोदरपणाचा नववा महिना सुरू झाल्याझाल्याच दोन्ही शस्त्रक्रिया करण्याची योजना वेगवेगळ्या शाखांतील तज्ज्ञांच्या बैठकीमध्ये आखली गेली होती. मात्र 4 दिवसांतच रुग्णाला तीव्र डोकेदुखी जाणवू लागल्याने व नाडीचे ठोके मंदावल्याने ही शस्त्रक्रिया लगेचच करण्याचा निर्णय घेण्यात आला व रुग्णाला त्याची कल्पना देण्यात आली. 


नाडीचे ठोके मंदावणे व डोकेदुखी हे मेंदूवरील दाब वाढल्याचे तसेच ब्रेनस्टेम हर्निएशनचे लक्षण असते. ही प्राणांना धोका निर्माण करणारी वैद्यकीय स्थिती आहे. या स्थितीवर लवकरात लवकर उपचार केले गेले नसते तर मातेला अंधत्व, मेंदूच्या कार्यावर परिणाम, सततची डोकेदुखी अशाप्रकारच्या इंट्राक्रेनियल म्हणजे कवटीच्या आतील भागावरील दाबामुळे उद्भवणा-या लक्षणांचा धोका होता. त्याचबरोबर अशा स्थितीमध्ये बाळाला होणा-या रक्तपुरवठ्यावरही परिणाम झाला असता व त्याची परिणती फीटल ब्रॅडिकार्डिया या वैद्यकीय स्थितीमध्ये झाली असती, ज्यात अर्भकाच्या हृदयाचे ठोके कमी होतात.''

भारतामध्ये प्रथमच, मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटल मध्ये चाळीस वर्षीय महिलेच्या प्रसूती समयी सी सेक्शनच्या दरम्यान ब्रेन ट्यूमवर डिकम्प्रेशन क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली भारतामध्ये प्रथमच, मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटल मध्ये चाळीस वर्षीय महिलेच्या प्रसूती समयी सी सेक्शनच्या दरम्यान ब्रेन ट्यूमवर डिकम्प्रेशन क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली Reviewed by News1 Marathi on September 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads