कपिल पाटील फौंडेशनतर्फे शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत कोरोना तपासणी शिबिरे
खासदार कपिल पाटील फौंडेशनतर्फे शहापूर तालुक्यात आयोजित केलेले शिबिर...
शहापूर | प्रतिनिधी : कोरोना रुग्णांची शहापूर तालुक्यातील वाढती संख्या व ग्रामीण भागातून शहापूरात येण्यासाठी रुग्णांची अडचण लक्षात घेऊन, खासदार कपिल पाटील फौंडेशनतर्फे ग्रामीण भागात भरविलेल्या मोफत कोरोना तपासणी शिबिरात १२५ हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून कोरोनाच्या रुग्णांचे वेळीच निदान होऊन संसर्ग रोखण्यासाठी मदत होत आहे.
शहापूर शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषत: सर्दी, ताप असलेल्या रुग्णांना दुर्गम भागातून कोरोना चाचणीसाठी शहापूरात आणण्यासाठी अडचणी येत होत्या. वाहन उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांबरोबरच नातेवाईकांचेही हाल होत होते. या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील फौंडेशनच्या वतीने शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत शिबिरे भरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार खर्डी, किन्हवली आणि शेणवा येथे शिबिरे घेण्यात आली. त्यात सुमारे १२५ हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरांसाठी स्थानिक ग्रामपंचायतीकडूनही संपूर्ण सहकार्य करण्यात आले.
या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील संशयित रुग्णांना गावाजवळ कोरोना चाचणी करण्याची सोय उपलब्ध झाली. त्याचबरोबर त्यातील संशयित रुग्णांचे निदान झाल्यानंतर त्यांना लगेचच रुग्णालयात उपचारासाठी व कमी संसर्ग असलेल्या रुग्णांना अलगीकरणात ठेवण्यात आले. या शिबिरांबद्दल खासदार कपिल पाटील फौंडेशनचे ग्रामस्थांकडून आभार मानण्यात येत आहेत. भाजपाचे भिवंडी तालुका चिटणीस राम माळी यांच्या वतीने शिबिरांचे संयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष हरड, रंजना उघडा, सतिश सापळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांनी सहकार्य केले.
कपिल पाटील फौंडेशनतर्फे शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात मोफत कोरोना तपासणी शिबिरे
Reviewed by News1 Marathi
on
September 30, 2020
Rating:

Post a Comment