Header AD

१२६निरंकारी भक्तांनी केले रक्तदान रक्तदात्यांच्या चेहऱ्यांवर झळकला विनम्रतापूर्वक सेवेचा भावकल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवनकळवा येथे रविवारी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये १२६ निरंकारी भक्तांनी विनम्रतापूर्वक सेवाभावनेने युक्त होऊन रक्तदान केले. वर्तमान कोविड-१९च्या स्थितिमध्ये एका बाजुला लोक घाबरलेले आहेत तर दुसऱ्या बाजुला निरंकारी भक्त मात्र संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक मार्गदर्शक सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या जीवन महत्वपूर्ण होते जेव्हा ते इतरांसाठी जगले जाते तसेच विनम्रभावाने मानवसेवा हीच प्रभुभक्ती’ अशा दिव्य शिकवणूकीचा अंगीकार करुन निर्भयपणे मानवतेच्या सेवेसाठी पुढे येत आहेत.


      या रक्तदान शिविरामध्ये संत निरंकारी रक्तपेढीने ८१ युनिट रक्त संकलित केले तर छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलकळवा यांच्या रक्तपेढीने ४५ युनिट रक्त संकलित केले. रक्तदाते तसेच दोन्ही रक्तपेढ्यांचे डॉक्टर्स आणि मेडिकल टेक्निशीयन्सच्या चमूंनी कोविड-१९च्या संदर्भात प्रशासनाकडून जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे व सूचनांचे तंतोतंत पालन करुन हे शिबिर यशस्वी केले.
      या रक्तदान शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी सेवादलाचे माजी क्षेत्रीय संचालक तथा ज्ञान प्रचारक बाबूभाई पांचाळ यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे कळवा व ठाणे विभागातील अनेक प्रबंधक उपस्थित होते  रक्तदान शिबिरांची ही श्रृंखला पुढे चालू ठेवत मिशनच्या वतीने पुढील शिबिर दिनांक ४ ऑक्टोबर२०२० रोजी संत निरंकारी सत्संग भवनओवळाठाणे येथे आयोजित केले आहे.


      संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक आणि मुखी यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सेवादल व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने हे रक्तदान शिबिर सुंदर रीतीने पार पाडले गेले. 

१२६निरंकारी भक्तांनी केले रक्तदान रक्तदात्यांच्या चेहऱ्यांवर झळकला विनम्रतापूर्वक सेवेचा भाव १२६निरंकारी भक्तांनी केले  रक्तदान रक्तदात्यांच्या चेहऱ्यांवर झळकला विनम्रतापूर्वक सेवेचा भाव Reviewed by News1 Marathi on September 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा

ठाणे , प्रतिनिधी  :   सालाबादप्रमाणे राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा करण्यात येतो ह्या सं...

Post AD

home ads