Header AD

कल्याण डोंबिवलीत ५७२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू


◆ एकूण ७,२४० रुग्ण तर ७५० जणांचा आतापर्यंत मृत्यूतर २४ तासांत ४८५ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण  | कुणाल म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ५७२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ५७२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३७,२४० झाली आहे. यामध्ये ५३१८ रुग्ण उपचार घेत असून ३१,१७२  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ५७२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ७२ कल्याण प.- १६६डोंबिवली पूर्व १७१डोंबिवली प- ८५मांडा टिटवाळा ५२,, मोहना – १८, तर पिसवली येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण शास्त्री नगर रुग्णालयातून तर जिमखाना कोविड सेंटर येथून १ रुग्ण  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ५७२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ५७२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads