Header AD

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 'आयराम' जिल्हाध्यक्ष बनविण्याचा घाट निष्ठावंताचा स्थानिक नेत्याच्या विरोधात रोष

कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आयराम कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष बनविण्याचा घाट घातला जात आहे. यामुळे पक्षातील निष्ठावंत नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षात काल परवा आलेल्यांना  जर जिल्हाध्यक्ष पद दिले जात असेल तर आम्ही इतके वर्ष पक्षात काम करत असल्याचा फायदा काय असा प्रश्न राष्ट्रवादी कल्याण जिल्हातील कार्यकर्ते विचारीत आहेत.

 राष्ट्रवादी कल्याण जिल्ह्यात नवीन अध्यक्ष नेमावा म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत.यात आता दुसऱ्या पक्षातून वर्षा दोन वर्षांपूर्वी आलेल्या 'आयराम'ला अध्यक्षपद मिळावे म्हणून जिल्ह्यातील नेते कामाला लागले आहेत. या बाबत कल्याण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया बोलक्या असल्याचे दिसून आलेमात्र पुढील होणार जिल्हाध्यक्ष पक्षाशी निष्ठावान असावा तो नवखा नसावा अशी प्रतिक्रिया पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

या बाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सचिव नोव्हेल साळवे यांनी सांगितले कीजो जिल्हाध्यक्ष नेमण्यात येईल तो पक्षाचा क्रियाशील सभासद असावा. त्याने पक्षाची क्रियाशील म्हणून पावती फाडलेली असावी. या पूर्वी ही अश्याच क्रियाशील नसलेल्या सभासदाला पक्षाचे जिल्ह्याध्यक्ष पद दिले होते. पण त्या नंतर येथे पक्षाला उतरती कळा लागली होती.

या कल्याण जिल्हाध्यक्ष पदाच्या नवीन नेमणुकी बाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ता प्रशिक्षण सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी सांगितले. पक्षाचा कल्याण जिल्हाध्यक्ष हा पक्षाशी एकनिष्ठ असावा तो तरुण असावा.पक्ष सर्वांना समावून घेतो म्हणून नविन आलेल्यानी पक्षात अगोदर काम करावे मग अनुभव घेऊन पद घ्यावे.

या बाबत प्रतिक्रिया देताना वक्ता प्रशिक्षण सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष मनोज नायर यांनी बोलताना सांगितले कीपक्षातील कार्यकर्त्यांबरोबर विचारविनिमय करुनच जिल्ह्याध्यक्ष नेमावा. जिल्हाध्यक्ष हा आयराम न करता पक्षाशी निष्ठावान कार्यकर्ता असावा असे त्यांनी सांगितले.

तर या बाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्वादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन यांनी सांगितले कीकाहींनी अजित पवार यांच्या फोटोला चपला मारणारयांचे नाव पुढे आणले असून, त्यांना आमचा प्रखर विरोध राहिल.  नाविन जिल्हाध्यक्ष नेमताना तो पक्षात अनेक वर्ष सातत्यपूर्ण काम करणारा असावातो सर्व बाबतीत परिपूर्ण असावा असे त्यांनी या वेळी प्रतिक्रिया देताना सांगितले.

सिडको अध्यक्ष पद भूषविलेल्या प्रदेश उपाध्यक्ष असलेले प्रमोद हिंदुराव व माजी आमदार जगन्नाथ (अप्पा) शिंदे यांची जिल्हाध्यक्ष पद नेमणुकीत मुख्य भूमिका असेल असे असताना जर नवखा आयराम कल्याण जिल्हाध्यक्ष दिला गेल्यास कार्यकर्त्यांन मध्ये रोष निर्माण होऊ शकतो असे दिसून येत आहे .या मुळे पक्षातील निष्ठावान अनेक वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांची वर्णी कल्याण जिल्हाध्यक्ष पदी लागावी असे राष्ट्वादी काँग्रेस कल्याण जिल्यातील कार्यकर्त्याचे मनोगत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


 

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 'आयराम' जिल्हाध्यक्ष बनविण्याचा घाट निष्ठावंताचा स्थानिक नेत्याच्या विरोधात रोष राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 'आयराम' जिल्हाध्यक्ष बनविण्याचा घाट  निष्ठावंताचा स्थानिक नेत्याच्या  विरोधात रोष Reviewed by News1 Marathi on September 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads