Header AD

माथाडी बांधवांचे जीवनमान सुधारण्या साठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आर एन यादव


◆ 
माथाडी कामगारांचे दैवत अण्णासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्तानं अभिवादन...


कल्याण   |  कुणाल  म्हात्रे  :   माथाडी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु असल्याचे मत  राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष आर. एन. यादव यांनी व्यक्त केले. माथाडी कामगारांचे दैवत, माथाडी चळवळीचे संस्थापक, माथाडी कामगार कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी खारघरच्यावतीने अभिवादन करण्यात आले.  यावेळी जिल्हाउपाध्यक्ष आर. एन. यादव, नवनिवार्चित शहर अध्यक्ष सुरेश रांजवण, शहर कार्यअध्यक्ष प्रदीप पाटील, अॅड संतोष खोपडे, खारघर प्रभारी व पनवेल जिल्हा सहसचिव कृणा मर्ढेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

माथाडी कामगारांच्या घरांचाआरोग्याचामुलांच्या शिक्षणाचामुलांच्या नोकरीचा प्रश्न सोडवून माथाडी बांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना संकटकाळात सुरक्षित वातावरण निर्माण करुन देण्यात येत आहे. बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक  विकास महामंडळाचे भागभांडवल ४०० कोटीने वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. आवश्यकते नुसार माथाडी मंडळाला अधिक निधीही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष आर एन यादव यांनी सांगितले.

 यावेळी शहरअध्यक्ष सुरेश रांजवण यांनी उपस्थितांना सबोधित करताना  माथाडी कामगारांची एकजूट कायम ठेवणं, माथाडींच्या हक्काची लढाई लढत राहणंमाथाडींना न्याय्य हक्क मिळवून देत त्यांच्या जीवनात सुधारणा घडवणंहीच अण्णासाहेबांना खरी आदरांजली ठरणार आहे अशा शब्दात जीवनपट ऊलघडला.

तर अण्णासाहेबांनी या राज्यातल्या शेतकरीकष्टकऱ्यांच्या हक्कांची लढाई लढली. माथाडींना संघटीत करुन त्यांच्या श्रमाला मोल आणि समाजात सन्मान मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडीट्रान्सपोर्ट  जनरल कामगार युनियनला तसेच माथाडींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांना बळ देणं ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे मत भाऊसाहेब लंबडे यांनी व्यक्त केले.

यावेळी भाऊसाहेब लबडेप्रदीप पाटील कार्यअध्यक्षसहसचिव पनवेल जिल्हा व प्रभारी कृष्णा मर्ढेकरप्रभाग  अध्यक्ष, सामाजिक कार्यकते महेशकुमार राऊतजिल्हा उपाध्यक्ष आर एन  यादवआदेश साळवीसुनिल  लोखंडे,  किरण वाघ, आनंद बोबडे, गौतम तांबेगणेश काळे गुरसळकरसचिन नेटकेयुसुब पटेलसमीर मोरेमनोज  वाघमारेअरूण पवार, किरण चोरगे, कुंडलिक सातपुते,   बळीराम सातपुते व सर्व महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.

माथाडी बांधवांचे जीवनमान सुधारण्या साठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आर एन यादव माथाडी बांधवांचे जीवनमान सुधारण्या  साठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरु  आर एन यादव Reviewed by News1 Marathi on September 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे शहर जि काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली

ठाणे , प्रतिनिधी  :  भारताचे थोर स्वातंत्र्य सेनानी,महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यति...

Post AD

home ads