Header AD

अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल - बाळासाहेब आंबेडकर

 

पुणे  |  प्रतिनिधी  : -  महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. गेल्या आठवड्यात याची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायाधीशांनी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून त्याची पुढील सुनावणी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठा (बेंच) कडे दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मिळणाऱ्या आरक्षणाला तात्पुरती का होईना स्थगिती मिळाल्याने मराठा समाजात नाराजीचे वातावरण आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राजकारण केले जात असल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 

अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल - बाळासाहेब आंबेडकर अन्यथा आरक्षणावर पाणी सोडावे लागेल -  बाळासाहेब आंबेडकर Reviewed by News1 Marathi on September 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads