Header AD

पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात इतर आजारासाठी उपचारसुरु करावे रिपाई युवक आघाडीची मागणी

डोंबिवली  |  शंकर जाधव  :  डोंबिवली पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय कोविड रुग्णालय असल्याने इतर आजारासाठी पालिकेची कोणतीही सोय या रुग्णालयात नाही.मार्च पासून इतर सर्व सामन्यासाठी आजारासाठी उपचार करणे बंद केले आहे. यामुळे गरीब नागरिकांना लॉकडाऊनमध्ये खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. आता अनलॉकच्या दिशेने पाउल टाकलेजात असताना डोंबिवलीत मात्र सर्व सामान्य नागरिकांना मात्र पालिकेचे दरवाजे बंद आहेत. यावर लक्ष देत रिपाई युवक आघाडीने मागणी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बडेकर यांना निवेदन देत गरीब रुग्णांवर उपचार सुरु करा अशी विनंती केली आहे.


रिपाईचे नेते माणिक उघडे आणि युवा आघाडीचे डोंबिवली शहर अध्यक्ष विकास खैरनार यांनी सदर निवेदन देऊन गरीब रुग्णांवर उपचार करू करा अशी मागणी केली आहे. पालिका प्रशासनाने कोरोना वर मात मिळवण्यासाठीयुद्धपातळीवर प्रयत्न केले. सुरुवातील पालिकेचे पश्चिमेकडील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालय कोविड रुग्णालय असल्याचे जाहीर केले. त्यामुळे इतर आजारांवर रुग्णांना इतर रुग्णालयात अथवा दावाखाण्यात जावे लागत होते. लॉकडाउनच्या भयानक परिस्थिती गरीबांवरचे उपचारावर होणारे हाल हे सर्वांनी पाहिले आहेत. आता आपले राज्य अनलॉकच्या दिशेने जात असताना दुसरीकडे सर्व सामान्य रुग्णांना अजूनही पालिकेचे रुग्णालय इतर आजारासाठी बंद आहेत. इतर जागेवर पालिकेने फक्त त्वचासंबंधित आजार आणि ताप,सर्दी, खोकला या आजारावर उपचार केले आहेत.अन्य आजारांवर पालिका प्रशासनाने गांभीर्य दाखवील नसल्याने अखेर रुग्णांसाठी रिपाई युवा आघाडीने पालिका प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.

      पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात इतर आजारासाठी उपचारसुरु करावे रिपाई युवक आघाडीची मागणी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात इतर आजारासाठी उपचारसुरु करावे रिपाई युवक आघाडीची मागणी  Reviewed by News1 Marathi on September 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १९७ नवे रुग्ण तर २ मृत्यू

  ■५३ , ९५७  एकूण रुग्ण तर १० ५९  जणांचा आता पर्यंत मृत्यू  तर २४ तासांत   १७५  रुग्णांना डिस्चार्ज... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण ...

Post AD

home ads