Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार पार ४८१ नवे रुग्ण तर १० जणांचा मृत्यू



एकूण रुग्ण ४०,४१२  तर  ७९५ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५०८ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार पार गेली असून आज नव्या ४८१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या ४८१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४०,४१२ झाली आहे. यामध्ये ४७३६ रुग्ण उपचार घेत असून ३४,८८१  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४८१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५१कल्याण प  १५६डोंबिवली पूर्व १५९डोंबिवली प- ८३मांडा टिटवाळा मोहना -१२, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 


 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १२१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून ११ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ११ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून२ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार पार ४८१ नवे रुग्ण तर १० जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार पार  ४८१ नवे रुग्ण तर १० जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on September 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads