Header AD

अरविंदो मीरा संस्थेतर्फे पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप


 

नवी मुंबई  |  प्रतिनिधी  : -  अरविंदो मिरा या सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या संस्थेतर्फे नवी मुंबईतील अनेक पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक पत्रकारांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.


कोरोना काळात बातम्यांचे संकलन करताना पत्रकारांचा संपर्क समाजातील अनेक घटकांशी येत असतो. पत्रकार हे अहोरात्र आपले काम करीत असतात. त्यामुळे कोरोना पासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून अरविंदो मीरा या संस्थेतर्फे अनेक पत्रकारांना आज मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याचा लाभ नवी मुंबईतील अनेक पत्रकारांनी घेऊन संस्थेचे आभार मानले. 


येत्या काही दिवसात इतर भागातील पत्रकार, सफाई कामगार, ब्युटीशियन, स्लम भागात मोठ्या प्रमाणावर मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असल्याचे अरविंदो मीरा या संस्थेच्या अध्यक्षा, चित्रपट अभिनेत्री नयन पवार यांनी सांगितले. तर ॲड. नागराज, हास्यसम्राट जयंत ओक, प्रसाद कोलते, विजया लक्ष्मी हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

अरविंदो मीरा संस्थेतर्फे पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप अरविंदो मीरा संस्थेतर्फे पत्रकारांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप Reviewed by News1 Marathi on September 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads