मराठा आरक्षण टिकले पाहिजे, ते टिकवणे ही सरकारची जबाबदारी - एकनाथ शिंदे
कल्याण | कुणाल म्हात्रे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणला दुर्दैवाने स्थगिती मिळाली. मात्र, मराठा आरक्षण टिकले पाहिजे. ते टिकवणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेत असल्याची माहिती नगरविकासमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शिंदे हे कल्याण-डोंबिवली महापालिकेने नव्याने उभारलेल्या कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी कल्याणात आले होते. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर आपले मत मांडले.
मराठा आरक्षण टिकले पाहिजे, ते टिकवणे ही सरकारची जबाबदारी - एकनाथ शिंदे
Reviewed by News1 Marathi
on
September 14, 2020
Rating:

Post a Comment