Header AD

हाथरस अत्याचार प्रकरण योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो - ऍड. प्रकाश आंबेडकरउत्तरप्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही...


पाटणा  :-  उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काल या तरुणाने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 


उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असून यावरून अस स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.


महिलांसोबत कोणी काहीही करू शकतो अशी मानसिकता झाली आहे. लोकांनी आता या प्रकरणावर बोलले पाहिजे.  या प्रकरणात सरकारने एसआयटीची नेमणूक करायची काहीही गरज नाही. यातील आरोपींची नावे पीडित तरुणीने घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी लोकांची दिशाभूल करण्याची गरज नसून मुलीच्या जबानीवरुन आरोपींना अटक केली आहे. त्यांना कठोर शासन करा. असेही ते म्हणाले.अशी माहिती राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 


हाथरस अत्याचार प्रकरण योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो - ऍड. प्रकाश आंबेडकर हाथरस अत्याचार प्रकरण योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो - ऍड. प्रकाश आंबेडकर Reviewed by News1 Marathi on September 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads