Header AD

विद्यार्थी भारतीने घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट


◆ एम.सी.क़्यु पॅटर्न ने परीक्षा घेतल्यास क़्वेशन बँक पुरवण्याचे उदय सामंत यांचे आश्वासन 
विद्यार्थी भारती देणार कुलसचिव व कुलगुरू यांना थापाड्या पुरस्कार


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर विद्यार्थी भारतीने राज्य सरकारला अनेक पत्र पाठवूनइमेल व ट्विटच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणताही प्रयोग न करता परीक्षेच नियोजन केले जावे असे आवाहन केले होते.

        एम.सी.क़्यु पॅटर्न हि नवीन पद्धत असून अनेक विद्यार्थ्यांना याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने तसेच विद्यार्थ्यांकडे स्टडी मटेरियल नसल्याने मुलं किती प्रमाणात ह्या परीक्षा पध्दतीला सामोरे जातील यात शंका होती. याबाबत मंगळवारी विद्यार्थी भारतीच्या शिष्टमंडळाने कुलसचिवांची भेट घेतली व या विषयावर चर्चा केली तेव्हा कुलसचिव विनोद पाटील यांच्या म्हणण्यातुन आले की हा पॅटर्न राज्यसरकार ठरवते त्यामुळे आपण काहीही करू शकत नाही. यानंतर बुधवारी सकाळी विद्यार्थी भारतीच्या शिष्टमंडळाने शिक्षण मंत्री उदय सामंत यांचीही भेट घेतली व कुलसचिवांशी झालेल्या चर्चेबाबत  बोलताना समजले की हा पॅटर्न विद्यापीठाने ठरवलेला आहे. तेव्हाच विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी कुलसचिव व कुलगुरू यांना थापाडे पुरस्कार देण्याचे घोषित केले.

तसेच शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करत असताना आम्हाला क़्वेशन बँक पुरवल्यास आम्ही त्याच्या आधारावर अभ्यास करू व किमान पास होऊ अशी  मागणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून होत आहे. म्हणून विद्यार्थी भारतीच्या शिष्टमंडळाने  विद्यार्थ्यांच्या मागणीचा हा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला. व त्यांनी ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. म्हणून सर्वच अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांनि आता आपापल्या महाविद्यालयातून क़्वेशन बँक मिळवण्यासाठी प्रयत्न करावे व अभ्यासाला लागावे असे विद्यार्थी भारतीच्या राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी सांगितले.

विद्यार्थी भारतीने घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट विद्यार्थी भारतीने घेतली शिक्षणमंत्र्यांची भेट Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

■शेअर बाजारात गुंतवणुकीद्वारे पैसा कमावण्याच्या कल्पनेने प्रत्येक नवा गुंतवणुकदार उत्साही होतो, तसेच कमी वेळेत तो श्रीमंत होईल, असा विश्वासह...

Post AD

home ads