Header AD

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडुन ५ लाखांची दंड वसुली केडीएमसीची धडक कारवाई सुरू


कल्याण  |  कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मनपाने कोरोना पार्श्वभूमीवर एप्रिल ते आँगस्ट अखेर पर्यंत मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलीत सुमारे ५ लाख रु. दंड वसुल केला असुन मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू आहे.              

कोरोन पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गला आळा बसण्यासाठी सोशल डिस्टन नियमाचे पालन करणे अंत्यत निकडीचे असुन देखील मनपाक्षेत्रातील काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न वापरताना फिरताना आढळल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलीत प्रत्येकी ५००रू दंड वसुल केला आहे. प्रशासकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनपाने जुन ते आँगस्ट दरम्यान केलेल्या प्रभागनिहाय  प्रभागानुसार कारवाई त   १/"अ "प्रभागात २३२ नागरिकांकडुन १,१६,०००रू.,  २/"ब"प्रभागातील कारवाईत २५७ नागरिकांकडुन १,२८,५०० रू., ३ /"क१०६ प्रभागातील नागरीकाकडुन ५५,०००रू, ४ /"जे " प्रभागात ४४ नागरिकांकडुन २१,७५० रू,  ५/ "ड " प्रभागातील  १५४ नागरिकाकडुन ७७,०००रू,  ६/"फ " प्रभागातील आणि  ७/"ह" प्रभागातील नागरिकांकडुन १३,०००, ८/"ग" प्रभागातील नागरिकांकडून १२,४००, "९/"आय्"  प्रभागातील ६० नागरिकांकडून १९,९००,  १० /"ई" प्रभागातील नागरिकांकडुन ४३,५०० दंड वसुल केला आहे.

याबाबत केडीएमसी आतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीसार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडुन दंड वसुल करण्याची मोहिम सुरु असुन करोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर केला पाहिजेतसेच जे दुकानदार आपल्या दुकानामध्ये आलेल्या ग्राहकांच्या बाबतीत सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळल्यास त्या दुकानदारावर देखील कारवाई करण्यात येणार असुन नागरिकांनी सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा असे आवाहन केले आहे."

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडुन ५ लाखांची दंड वसुली केडीएमसीची धडक कारवाई सुरू सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडुन ५ लाखांची दंड वसुली केडीएमसीची धडक कारवाई  सुरू   Reviewed by News1 Marathi on September 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads