Header AD

अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळा मारा भाजपाचा महावितरणला इशारा

ठाणे | दि ७ | प्रतिनिधी : महावितरणने नागरिकांना भरमसाठ बिले दिले आहेत हि बिले कमी करावी याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वारंवार आंदोलन करूनही  महावितरण व सरकार याकडे दुर्लक्ष  करत असल्याने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळा ठोकू असा इशारा भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे यांनी दिला आहे.

कोरोनाच्या संकटात आधीच नागरिक अडकलेले असताना महावितरणने नागरिकांना भरमसाठ बिले दिले आहेत यासाठी वारंवार भाजपच्या माध्यमातून आंदोलने करून देखील महावितरण प्रशासन व  सरकार याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी असून याबाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास पातलीपाडा महावितरण कार्यालयाला टाळे मारून आंदोलन करू असा इशारा भाजपाचे उपाध्यक्ष रमेश आंब्रे यांनी महावितरण विभागाला दिला आहे. सोमवारी रमेश आंब्रे व कार्यकर्त्यांनी घोडबंदर रोडवरील पातलीपाडा येथील महावितरण विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी राजेश सावंत, संदीप माने, देवाभाई मोडवडिया, प्रशांत मोरे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 भरमसाठ वीज बिलांबाबत भाजपच्या माध्यमातून वारंवार आंदोलन करून हि महावितरण विभाग व सरकार अजूनही नागरिकांना बिले पाठवत आहेत. नागरिकांची बिले कमी करावे म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलन करूनही नागरिकांची बिले कमी करण्याबाबत महावितरण विभाग व सरकार काही करत असल्याने आता तीव्र आंदोलन करून महावितरण विभागाला टाळे मारू असे यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष श्री. रमेश आंब्रे यांनी सांगितले.

अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळा मारा भाजपाचा महावितरणला इशारा अन्यथा महावितरण कार्यालयाला टाळा मारा भाजपाचा महावितरणला इशारा Reviewed by News1 Marathi on September 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads