पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसा निमित्त सिद्धेश पाटील यांच्यावतीने 450 कोरोना रुग्णांना फळेवाटप तर 70 पीपीई किट वाटप
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने भाजपाचे जिल्हा संघटक सिद्धेश कपिल पाटील यांच्या वतीने भिनार व आसनगाव येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना देण्यासाठी डॉक्टरांकडे फळकिट सोपविताना भाजयुमोचे कार्यकर्ते....
भिवंडी | रवी शिंदे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सेवा सप्ताहात जिल्हा संघटक सिद्धेश कपिल पाटील यांच्या वतीने भिनार व आसनगाव येथील सेंटरमधील 450 हून अधिक रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तर भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील यांच्यावतीने भिनार कोविड सेंटरमधील वैद्यकिय कर्मचाऱ्यांना 70 पीपीई किट प्रदान करण्यात आल्या.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. भाजपाचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे यांच्या सुचनेनुसार सेवा सप्ताहानिमित्ताने भाजपाचे जिल्हा संघटक सिद्धेश पाटील यांच्या वतीने भिनार व आसनगाव येथील सेंटरमधील 450 हून अधिक रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तसेच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील यांच्यावतीने भिनार येथील डॉक्टरांना 70 पीपीई किट प्रदान करण्यात आल्या.
श्रीधर पाटील यांच्याबरोबरच जगन पाटील, निलेश गुरव, योगेश भोईर आदींसह कार्यकर्त्यांनी भिनार कोविड सेंटरच्या प्रवेशद्वारावर डॉक्टरांकडे फळांचे पॅकेट व पीपीई किट सुपूर्द केल्या. तसेच सिद्धेश पाटील यांच्या वतीने रुग्णांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भिवंडी विधानसभा अध्यक्ष पप्पू खंडागळे, भाजयुमो तालुका अध्यक्ष निलेश गुरव सह पदाधिकारी, कार्यकर्त्ये उपस्थित होते .

Post a Comment