Header AD

पाणी बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबरपासून विशेष मोहिम


◆ नागरिकांनी या मोहिमेस सहकार्य करावे ठाणे महापालिका आयुक्तांच आवाहन....

ठाणे | प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असल्याने व या कामांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी व्यस्त झाल्याने ठाणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना पाण्याच्या नळ संयोजनाची देयके या आर्थिक वर्षामध्ये (सन 2020-21) ऑगस्ट अखेरपर्यत देण्यात आली आहेत. परंतु या देयकामध्ये त्रुटी क्षेत्रफळ, कुटूंब संख्या, सदनिका संख्या, थकबाकी रक्कम, प्रशासकीय आकाराची रक्कम याबाबत त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, या त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबर 2020 पासून विशेष मोहिम राबविण्यात असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.‍विपीन शर्मा यांनी केले आहे.


या त्रुटी दूर करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नजीकच्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यत व दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, मिटर रिडर यांच्याकडे प्राप्त झालेले पाणी बिल व इतर सर्व कागदपत्रांसह समक्ष जाऊन बिलामधील त्रुटी दूर करण्यासाठी सहकार्य करावे.‍बिलांमधील त्रुटी दूर करुन संबंधित ग्राहकांना सुधारीत बिल देण्यांत येणार आहे. तरी नागरिकांनी या विशेष मोहिमेतंर्गत आपल्या बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणी बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबरपासून विशेष मोहिम पाणी बिलांमधील त्रुटी दूर करण्यासाठी 21 सप्टेंबरपासून विशेष  मोहिम Reviewed by News1 Marathi on September 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads