Header AD

हाथरसमधील पीडित दलित मुलीच्या कुटुंबियांची दि.2 ऑक्टोबरला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सांत्वनपर भेट घेणार
जलदगती न्यायालयात खटला चालवून हाथरसच्या दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या | रिपब्लिकन पक्षाचे उद्या दि.1 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात  निषेध आंदोलन - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले..


मुंबई  | प्रतिनिधी  : -  उत्तर प्रदेशच्या हाथरसच्या चांडपा गावात 19 वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक अत्याचार केल्यानंतर  तिच्यावर उपचार सुरू असताना 14 दिवसांनी या दलित  मुलीचे निधन झाले. ही अत्याचाराची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय  राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. याप्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालवून त्वरित सर्व आरोपीना फाशीची कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.


उद्या हाथरस दलित मुलीच्या अत्याचारप्रकरणाच्या निषेधसाठी  दि.1 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता  मुंबईत आझाद मैदान येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र  निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ना रामदास आठवले दिली आहे .

 

हाथरसच्या दलित मुलीवरील अत्याचार आणि हत्येचा गुन्हा हा माणुसकीची हत्या आहे. याप्रकरणातील निधन झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांची दि. 2 ऑक्टोबर रोजी केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले सांत्वनपर भेट घेणार आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पीडित शोकाकुल परिवाराला रिपाइं तर्फे  सांत्वनपर  आर्थिक मदत करणार आहेत. याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकार ने पीडित परिवाराला भरीव आर्थिक मदत द्यावी; सदर चा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी या मागणीसाठी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आणि उत्तर प्रदेशचे राज्यपाल महामहिम आनंदीबेन पटेल यांची दि. 3 ऑक्टोबर रोजी  आपण भेट घेणार आहोत असे ना रामदास आठवले यांनी संगितले. 


दरम्यान आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हाथरस च्या दलित मुलीवर अत्याचार आणि हत्या  प्रकरणाच्या अमानुष गुन्ह्याच्या  निषेधार्थ अंधेरी पूर्व  येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यावर आंदोलन करून निवेदन देण्यात आले . यावेळी रिपाइं चे काकासाहेब खंबाळकर; नवीन लादे; प्रकाश कमलाकर जाधव;रतन स्वारे आदी अनेक कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले. 

हाथरसमधील पीडित दलित मुलीच्या कुटुंबियांची दि.2 ऑक्टोबरला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सांत्वनपर भेट घेणार हाथरसमधील पीडित दलित मुलीच्या कुटुंबियांची दि.2 ऑक्टोबरला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सांत्वनपर भेट घेणार   Reviewed by News1 Marathi on September 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads