डोंबिवली बस स्थानक उघड्यावर
न्यूज१ मराठी । नेटवर्क
स्वच्छता गृहाच्या भिंतीवर शेवाळे लागल्याने भिंती भुसभुशीत झाल्या आहेत. या स्थानकात एकच नियंत्रक असून तोच तिकीट आरक्षणाचे काम करत असतो. त्याची वेळ सकाळी 9 ते दुपारी दोन अशी असल्याने सकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत बहुसंख्य बसेस बाहेरगावी जातात पण प्रवाशाच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणी नसल्याने प्रवासी व बस वाहक-चालक यांच्यात वादाचे प्रसंग येतात. हीच अवस्था संध्याकाळी असते. बाहेरगावावरून येणार्या बसेसची नोंद कोण घेत नाही. किमान 2 कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे. बस स्थानकात तीन पाणी टाक्या बांधण्यात आल्या असून त्यांना पाणी नाही. त्यांचे नळ चोरीला जातात अशी तक्रार आहे. रात्री बस स्थानकावर नशा करणारे टोळके बसते, तेथे अनेक गैरप्रकार चालू असतात अशी परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. दिवसभर कोणी वाली नसल्याने खाजगी वाहनांचे ते पार्किंगची जागा झाली आहे.
डोंबिवली बस स्थानक उघड्यावर
Reviewed by News1 Marathi
on
July 01, 2019
Rating:

Post a Comment