Header AD

धरणांच्या पाणी साठ्यात वाढ न्यूज१ मराठी । नेटवर्क 

ठाणे जिल्ह्यातील शाहापुर आणि मुरबाड तालुक्याला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते.

 त्यात मागील वर्षी पावसाने कमी कालावधीत जास्त बरसला. तर, दोन महिने ओढ दिल्याने धरणसाठ्यातील पाणी साठ्यात देखिल कमालीची घट होत असल्याने जिल्ह्यावर पाणी कपातीचे टांगती तलवार होती. 

धरणांच्या पाणी साठ्यात वाढ


जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा (टक्केवारीत)

       धरणांची नावे        27 जून स्थिती      30 जूनची स्थिती

*भातसा                   22.12                   24.22
*तानसा                   1.62                      5.13
*बारवी                     13.87                  17.01
*धामणी                   18.39                   18.61

*मोडक सागर            25.21                   25.17  

जून महिन्याच्या शेवटचा आढवडा उजाडला असतांना देखिल पावसाने ओढ दिली होती. त्यात 27 जून पासून पावसाने जिल्ह्यातील शहरीभागासह ग्रामीण व धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात 4 ते 5 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आकडेवारी वरून दिसून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून कोसळत असलेल्या पावसामुळे बारवी धरणातील पाणी सुमारे 4 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आढळून आले.

धरणांच्या पाणी साठ्यात वाढ धरणांच्या पाणी साठ्यात वाढ Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

लॉकडाऊनमध्ये गाळा हडपण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने उधळला

   ठाणे , प्रतिनिधी  :  लॉकडाऊन कालावधीत गावी गेलेल्या मुझफ्फर खान या गाळेधारकाचा पंधरा वर्षांपासूनचा गाळा बळकावून मालकाला धमकावण्याचा प्रका...

Post AD

home ads