काश्मीरमध्ये ट्युलिपची बहार
न्यूज१ मराठी । नेटवर्क
2. ट्युलिपचं सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत. एका आठवड्यात 70 हजारहून अधिक पर्यटकांनी या ट्युलिप गार्डनला भेट दिली आहे. पर्यटनाच्या आधारे गुजराण करणार्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
3. या बागेत 12 लाखांहून अधिक ट्युलिपची रोपं आहेत. ट्युलिपच्या रोपाचं आयुष्य तीन ते चार वर्षांचं असतं. वेगवेगळ्या रंगाच्या ट्युलिपच्या फुलांमुळे बगीचा ’इंद्रधनुषी’ रंगांनी फुलला आहेे.
4. दल सरोवराच्या काठावर असलेल्या जबरवान टेकड्यांमध्ये 90 एकरच्या क्षेत्रात ट्युलिप फुलांचा हा गालिचा पसरला आहे.
5. काश्मीर खोर्यातील पर्यटनाचा सीझन दोन महिन्यांनी वाढावा, या उद्देशानं ट्युलिप बगीचा तयार करण्यात आला आहे. इथे येणार्या पर्यटकांची वाढती संख्या पाहता हा उद्देश सफल होताना दिसत आहे.
6. लाल, गुलाबी, पिवळ्या, पांढर्या, निळ्या आणि जांभळ्या रंगाची ट्युलिपची फुलं पाहून असं वाटतं, की रंगांचा गालीचा जमिनीवर पसरला आहे. जगभरातून पर्यटक ट्युलिपचा बगीचा पहायला येतात.
7. श्रीनगरमधल्या बादामवाडीतली बदामाच्या झाडांची रांगही नजर खेचून घेते. कदाचित त्यामुळेच बादामवाडी जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे.
8. बादामवाडी कोह-ए-मारन पर्वतरांगांमध्ये वसलेलं ठिकाण आहे. इथं वर्षभर पर्यटक येत असतात. मात्र मार्च महिन्यात इथे येणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झालेली दिसते.
9. बादामवाडीतील वेगवेगळ्या रंगाची फुलं या छोट्याशा गावाला अधिक मनमोहक बनवतात.
10. काश्मीर खोर्यात मोहरीची ही पिवळी फुलंही ट्यूलिपच्या सौंदर्याशी स्पर्धा करत आहेत. वसंत ऋतूच्या सौंदर्यात या पिवळ्या धमक फुलांनी अधिक भर घातली आहे.
काश्मीरमध्ये ट्युलिपची बहार
Reviewed by News1 Marathi
on
July 01, 2019
Rating:

Post a Comment