Header AD

शिक्षण आणि महिला सक्षमीकरण

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

क्तीच्या सर्वंकष विकासासाठीची मुलभूत गरज म्हणजे शिक्षण.  शिक्षणाने व्यक्ती नि समाज सक्षम होऊन देशाच्या विकासात  ते सहाय्यभूत ठरत असतात. देशाची आर्थिक वृद्धी आणि सामाजिक बदलासाठीही शिक्षण आवश्यक असते. देशाची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि देश सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत करण्यात शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची आहे. चीन नंतर जगात सर्वात मोठी शिक्षणव्यवस्था भारताची आहे. भारतीय शिक्षण पद्धतीला प्राचीन इतिहास आहे. बौद्ध कालखंडात नालंदा आणि तक्षशीला ह्या दोन भारतीय विद्यापीठांची किर्ती जगभर पसरली होती. ब्रिटीशांच्या आगमनानंतर भारतात शिक्षणाचे नवे पर्व प्रारंभ झाले. 
भारतात मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात सुरू करून महात्मा जोतिराव  आणि क्रांती ज्योति सावित्रीबाई  ह्या युगप्रवर्तक फुले दाम्पत्याने महिला सक्षमीकरणाची वाट खुली केली. शिक्षण हेच महिला सक्षमिकरणाचे आद्य साधन आहे. भारतीय महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र तथा राज्य सरकारांनी अनेक योजना आखल्या. अनेक उपक्रम राबविण्यात आले. सुरुवातीच्या काळात महिलांमधली साक्षरता वाढवण्यासाठी उपाय करण्यात आले.  ग्रामीण, आदिवासी भागाच्या तसेच दलीत, मागासवर्गीय समाजाच्या मुलींकडे विशेष लक्ष देण्यात आले. यात आश्रम शाळा, वसतिगृहे, शुल्क माफी, मध्यान्य भोजन, गणवेश वाटप, पाठय पुस्तकांचे  वितरण यासारख्या विविध सोई - सुविधा निर्माण करण्यात आल्या. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केवळ मुलींसाठी स्वतंत्र शैक्षणिक संस्था स्थापन केली. कालांतराने ह्या संस्थेचे रूपांतर विद्यापीठात झाले. मुलींसाठी स्थापन झालेले भारतातले हे पहिले विद्यापीठ एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. महिलांचे शिक्षण आणि आरोग्य यांचा एकमेकांशी निकटचा संबंध आहे. शिक्षणाने महिला स्वतः च्या आरोग्याबाबत जागरूक झाल्या. आपल्या क्षमता आणि कौशल्य विकसित झाल्याने त्या आत्मनिर्भर झाल्या. चार भिंतीआडचे जीवन सोडून मोकळ्या अवकाशात त्यांनी भरारी घेण्यास सुरुवात केली. आज महिला देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे नि उल्लेखनीय योगदान देत आहेत. महिलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी दूरस्थ शिक्षण प्रणाली कशी महत्वाची आहे, हे आपण जाणून घेऊ या.

शिक्षण आणि महिला सक्षमीकरण

सर्वप्रथम दूरस्थ शिक्षण म्हणजे काय, याचा विचार करू. इंग्रजीतल्या वळीींरपलश शर्वीलरींळेप ह्या  संकल्पनेचे मराठी रूपांतर म्हणजे दूरस्थ शिक्षण. शिक्षणाचा विचार करताना दूरस्थ म्हणजे जेथे शिकणारा आणि शिकवणारा एकमेकांसमोर उपस्थित नाहीत.  शिकण्याची इच्छा असणारी व्यक्ती तिचे दैनंदिन काम सांभाळून ती आहे त्या ठिकाणी शिकते, यासाठी विशिष्ट पद्धतीने लिहिलेली अध्ययन साहित्य वापरते, मल्टी मीडिया (वेब साईट, ब्लॉग, वळीर्लीीीळेप फोरम, वेगवेगळे ऍप्स,  वेब रेडिओ, व्हिडीओ कॉन्फरन्स इ.इ.)चा उपयोग करते. यानंतर तिला आलेल्या अडचणी, शंका, उद्भवलेले प्रश्न यांचे निरसन करण्यासाठी निर्धारित दिवशी निवडलेल्या अभ्यासकेंद्रावर जाते. तेथे संबंधित विषयाच्या अध्यापकाकडून आपल्या अडचणी सोडवून घेते. अशा पध्दतीने दूरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये अध्ययन  व अध्यापनाची प्रक्रिया घडून येत  असते. 
कधी कधी मुक्त अध्ययन आणि दूरस्थ शिक्षण ह्या दोन संकल्पना एकत्रितपणे वापरल्या जातात. ह्या दोन्हीचे संयुक्त रूप म्हणून ‘मुक्त आणि दूरस्थ शिक्षण’ रपव असेही म्हटले जाते. वस्तुतः मुक्त अध्ययन ही  एक तत्वप्रणाली  असून दूरस्थ शिक्षण ही पद्धती आहे. आपण आता मुक्त अध्ययनाची वैशिष्ट्य समजून घेऊ. 
ज्या कोणाला शिकायचे आहे, त्यास याचा लाभ घेता येतो. यासाठी कमाल वयोमर्यादा नाही. आपल्या सोयीनुसार अध्ययन करता येते. शिक्षणक्रम/अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मुबलक कालावधी असतो. वर्गात प्रत्यक्ष उपस्थिती चे बंधन नसते. नोकरी, व्यवसाय करणार्‍यांना याचा मोठा फायदा होतो. विषय तज्ज्ञांनी लिहिलेले दर्जेदार अध्ययन साहित्य पुरवले जाते. वर उल्लेख केल्याप्रमाणे ही पुस्तके स्वयंनिर्देशित (डशश्रष खर्पीीीींलींळेपरश्र चशींहेव) पद्धतीने लिहिलेली असतात.त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही. कोणी तरी आपल्याशी संवाद साधत आहे,असे वाटते. या पद्धतीत केवळ पुस्तके वाचून अभ्यास करायचा असतो असे नाही तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाचाही लाभ अध्ययनार्थीना घेता येतो. यासाठी  अभ्यासकेंद्राची उपलब्धता हे देखील या प्रणालीचे  महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अभ्यासकेंद्र म्हणजे असे ठिकाण की जेथे सर्व शैक्षणिक सोयी, सुविधा आणि मार्गदर्शक प्राध्यापक उपलब्ध असतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या अध्यापकांना दूरस्थ शिक्षण पद्धतीत ’संमंत्रक’ संबोधले जाते. ही अभ्यासकेंद्रे बर्‍याचदा पारंपरिक विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये कार्यरत असतात. ह्या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करता शिक्षणाची ही पद्धती मुली व महिलांसाठी अतिशय उपयुक्त नि पूरक आहे, असे दिसून येते.

देशाच्या एकूण लोकसंख्येचा अर्धा हिस्सा महिलांनी व्यापलेला आहे. पण  पुरुषांच्या तुलनेत त्यांचा उत्पादक कामात फार कमी सहभाग आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्यामधली साक्षरता आणि शिक्षणाचे प्रमाण.  कोणत्याही देशाच्या प्रगती चे मोजमाप करायचे झाल्यास त्या देशातल्या महिला कीती शिक्षित आहेत   ते पाहणे महत्वाचे असल्याचे डॉ.बाबासाहेब  आंबेडकर यांनी सांगितले आहे. यावरून ते महिलांच्या शिक्षणाला किती महत्व देतात हे लक्षात येते. मुक्त आणि दूरस्थ शिक्षण पध्दतीने महिलांना आपली शैक्षणीक प्रगती करणे सहज शक्य आहे. कारण यासाठी त्यांना अभ्यासासाठी अभ्यासकेंद्रावर रोज उपस्थित राहण्याची गरज नाही. आपले रोजचे कामकाज सांभाळून त्या अभ्यास करू शकतात. एखादा शिक्षणक्रम निर्धारित कालावधीत पूर्ण झालाच पाहिजे, असा दबाव नसतो. आपल्या सवडीने आणि आवडीने त्या शिकू शकतात. शिकण्याची संधी मिळाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. त्यांना प्राप्त होऊ शकणार्‍या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होते. त्यांची क्षमता आणि कौशल्ये वृद्धिंगत होतात.  त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता वाढते. कुटुंबात नि समाजात त्यांना आदराचे स्थान प्राप्त होते. त्यांचे संवाद कौशल्य प्रभावी होते. त्यांचा दृष्टीकोन व्यापक होतो.  जीवनातल्या विविध आव्हानांना सामोरे जायला बळ मिळते.  वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात निर्भयपणे वावरता येते. आपल्या हक्क आणि अधिकारांविषयी जागरूकता येते. रोजच्या नागरी समस्या उदा. पिण्याचे पाणी, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, किमान वेतन कायदा, शिक्षणाच्या सोयी सुविधा, महिलांचे शोषण, अन्याय- अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, अन्न पदार्थ भेसळ, प्रदूषण, पर्यावरण संरक्षण, बालकांचे हक्क यासारख्या मुद्द्यावर महिला सजग होताना दिसतात. शिवाय तंत्रज्ञान वापरण्यामागची भीती देखील नाहीशी होते. एकूणच विचार केला असता असे स्पष्ट होते की महिलांच्या सक्षमीकरणात ‘मुक्त आणि दूरस्थ शिक्षण’ पध्दती चा महत्वाचा वाटा आहे, यात दुमत नाही.आपल्या राज्यात गेले 30  वर्षे हे कार्य नाशिक स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अव्याहतपणे करून राज्यातल्या महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या प्रक्रियेत उल्लेखनीय योगदान देत आहे. विद्यापीठाने शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी संपूर्ण राज्यात आपली यंत्रणा निर्माण केली आहे. राज्यातल्या महसूल विभागाच्या मुख्यालयात (मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड येथे) विद्यापीठाचे विभागीय केंद्रे सुरु केली आहेत. नाशिक येथील मुख्यालय, आठ विभागीय केंद्रे आणि संपूर्ण महाराष्ट्रात असलेली शिक्षणक्रमानिहाय अभ्यासकेंद्रे अशा रीतीने विद्यापीठाचे काम सुरु आहे. सन 2019-20 ह्या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून इच्छुकांना निर्धारित मुदतीत उपलब्ध शिक्षणक्रमांसाठी प्रवेश घेता येईल. प्रवेश प्रक्रिया असून याकरिता विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आवश्यक ती सर्व माहिती आणि तपशील उपलब्ध आहे. 

शिक्षण आणि महिला सक्षमीकरण शिक्षण आणि महिला सक्षमीकरण Reviewed by News1 Marathi on July 08, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads