आडीवली ढोकळी पाण्याखाली
न्यूज१ मराठी । नेटवर्क
पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात घुसल्याने त्यांच्या गृह उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून लहान मुलांना घेऊन नागरीकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. काहींनी घरे तशीच सोडून जवळच्या नातेवाईकांकडे धाव घेतली आहे. पावसाने दुपारी उसंत घेतली होती. मात्र या भागातील जलमय परिसरातील पाण्याचा निचरा झालेला नाही. येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असल्यने स्थानिक नगरसेवक कुणाल पाटील यांनी नागरिकाच्या जेवणाची सोय केली.
नगरसेवक कुणाल पाटील यांनी या भागात नाले लहान आकाराचे असून मोठ्या आकाराचे नाले बांधण्याची मागणी दोन वर्षांपासून पालिका प्रशासनाकडे करत याबाबत सातत्याने पाठपुरवा केला आहे. मात्र पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला असून पालिकेच्या निष्काळजी पणामुळे नागरिकांना या तुंबलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करावे लागल्याचे त्यांनी सांगितले.
आडीवली ढोकळी पाण्याखाली
Reviewed by News1 Marathi
on
July 01, 2019
Rating:

Post a Comment