Header AD

ठाण्यात अतिवृष्टीच्या शक्यतेने घराबाहेर पडू नये  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

ठाणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. दरम्यान अतिवृष्टीच्या काळात अधिकार्‍यांनी अलर्ट राहण्याचे आदेश त्यांनी सर्व महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ठाणे यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी नागरिकांनी अत्यावश्यक बाब वगळता घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. दरम्यान सोमवारी रात्रभर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे लोकप्रतिनिधी, अग्नीशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल(टीडीआरएफ), सर्व अधिकारी आणि प्रभाग स्तरिय आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेत होते. सखल भागांच्या उपाय योजनेसाठी नगरसेवकांना विश्वासात घ्या अतिवृष्टीच्या काळात ज्या सखल भागामध्ये पाणी साचते त्या ठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून स्थानिक नगरसेवकांना विश्वासत घेण्याच्या सूचना देतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याबाबत 8 तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. 

ठाण्यात अतिवृष्टीच्या शक्यतेने घराबाहेर पडू नये

दरम्यान अतिवृष्टीच्या काळात सार्वजनिक विभाग, पाणी पुरवठा विभाग, विद्युत विभाग, नाले आणि मलःनिस्सारण विभागाने तीन पाळ्यांमध्ये 24 तास कार्यरत राहण्याच्या सूचनाही जयस्वाल यांनी दिल्या आहेत. टीडीआरएफ दलासोबत अँम्ब्युलन्स, तात्काळ प्रतिसाद वाहन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) प्रभावी ठरावे यासाठी त्या पथकासोबत आता अँम्ब्युलन्स आणि तात्काळ प्रतिसाद वाहन (क्यूआरव्ही) देण्याच्या सूचना दिल्या असून सोमवारी रात्री अतिवृष्टीमध्ये अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाबरोबरच टीडीआरएफ दलाने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. एनडीआरएफच्या धर्तीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी टीडीआरएफची स्थापना केली. या पथकामध्ये सद्यस्थितीत एक उपकमाडंट आणि 40 प्रशिक्षित जवान कार्यरत आहेत. गेल्या दोन आठवड्यापसून विविध स्तरावर त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे पथक अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत कार्यरत झाले आहे. हे दल आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे काम करावे यासाठी या पथकासोबत  अँम्ब्युलन्स आणि एक तात्काळ प्रतिसाद वाहन (क्यूआरव्ही) देण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या आहेत.
ठाण्यात अतिवृष्टीच्या शक्यतेने घराबाहेर पडू नये ठाण्यात अतिवृष्टीच्या शक्यतेने घराबाहेर पडू नये Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads