Header AD

बुद्धीबळाच्या पटावर विश्वविक्रम !

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

आपल्या भारताला कला, क्रिडा, शास्त्र ह्याचा अमूल्य असा वारसा लाभलाय. भारतातील अनेक प्रतिभावंत कलावंत आपल्या अभूतपुर्व कलेतून आपल्या भारताचं नाव जगाच्या इतिहासात कोरत असतात. असेच आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील दोन विश्वविक्रमवीर, आबासाहेब शेवाळे आणि चेतन राऊत ज्यांची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स ने 15 मार्च रोजी 2018-19 च्या सर्वोत्कृष्ट 100 मध्ये निवड करण्यात आली. आबासाहेब शेवाळे ह्यांनी ह्याआधी तीन विश्वविक्रम केलेत. आबासाहेब हे पुशपिन्सपासून मोझेक पोट्रेट बनवण्यात सुप्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे त्यांनी पुशपिन्सपासून मोझेक पोट्रेट बनवले आहेत ज्यात महेंद्रसिंग धोनी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. त्यांच्या ह्या पुशपिन्स पोट्रेटसची नोंद लिम्का बुकमध्ये नोंदवली आहे. ह्याशिवाय त्यांनी शिवाजी महाराजांचे कागदी पिशव्यांपासून बनवलेले मोझेक पोट्रेट ज्याची नोंद युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स मधे झालीय, तसेच ऑक्टोबर 2018 मध्ये विराट कोहलीच सर्वांत मोठे मातीच्या पणत्यांपासून बनवलेले मोझेक पोट्रेट ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. त्यांच्यासोबत सलग विश्वविक्रमाची मालिका करणारे चेतन राऊत हेही सुप्रसिद्ध मोझेक पोट्रेट कलाकार आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल आठ विश्वविक्रम केलेत. त्यांनी बनवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे जगातील सर्वात मोठे सीडी मोझेक पोट्रेटची निवड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक बुक ऑफ रेकॉर्ड्स, वल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये झालीय. याशिवाय त्यांचे किबोर्डच्या बटणांपासून बनवलेले डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांचे मोझेक, रूद्राक्षांपासून साकारलेले बाळासाहेब ठाकरे ह्यांचे मोझेक सुप्रसिद्ध आहेत.

बुद्धीबळाच्या पटावर विश्वविक्रम !

असे हे दोन विश्वविक्रमवीर आता मिळुन सज्ज झालेत आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी! बुद्धीबळाच्या सोंगट्यांनी साकार होणार एक अद्वितीय कलाकृती! क्रिकेट विश्वातील एक असामान्य व्यक्तिमत्व. एक असा चेहरा ज्याला अवघी दुनिया ‘माही’ म्हणून ओळखते. भारताचा सुप्रसिद्ध कुल कॅप्टन महेंद्रसिंग धोनी! सध्या पुन्हा एकदा जगभर वर्ल्ड कपचं उधाण सुरू आहे. शिवाय आज, आपल्या ह्या लाडक्या क्रिकेटवीराचा वाढदिवस. असे दोन्ही औचित्य साधून त्याला शुभेच्छा देण्यासाठी तसेच ह्या आगळ्यावेगळ्या कलाकृतीसाठी तितक्याच आगळ्यावेगळ्या माणसाची निवड करावी म्हणूनच बुद्धीबळाच्या सोंगट्यापासून साकार होणार आहे. भारताचा कुल कॅप्टन अशी ओळख असलेला महेंद्रसिंग धोनी उर्फ आपल्या सर्वांचा लाडका माही ह्याची प्रतिकृती!
ही कला सादर करण्यामागे आबासाहेब शेवाळे आणि चेतन राऊत ह्यांच्या संपूर्ण टीमने कंबर कसून मेहनत घेतलीय. सुमारे 1,41,000 लाल, काळ्या, फिकट पांढर्‍या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा विविध रंगांच्या सोंगट्यांचा वापर केला गेला आहे. तसेच ह्या पोट्रेटची लांबी 30 फुट आणि रूंदी 20 फुट आहे. ह्या अद्वितीय कलाकृतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकारांनी त्यांचं स्वत:चं कसब पणाला लावून ते पूर्णत्वास नेण्यास संपूर्ण प्रयत्न केलेत. आणि साकार झालीय न भुतो न भविष्यती अशी भव्य कलाकृती. बुद्धीबळ..मन शांत ठेवून डोक्याने खेळला जाणारा खेळ. ज्यासाठी स्थिर बुद्धी आणि एकाग्र चित्त ठेवावं लागतं. प्रतिस्पर्ध्याला गाफील ठेवून त्याला शह देऊन त्याच्यावर मात करणे हा ह्या खेळाचा मुख्य उद्देश्य असतो.
पण तुम्हांला माहीतेय का बुद्धीबळामधे आपण जसं शह आणि मात देऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा आवडता खेळ क्रिकेटमधेही पायचीत करू शकतो, तेही समोरच्या खेळाडुला गाफील ठेवून! बुद्धीबळ आणि क्रिकेटमधील साधर्म्यच जणु हे! अनेक क्रिकेट खेळाडूंना स्टंप च्या मागून चेकमेट करणारा ‘माही’ हा असंख्य क्रिकेट प्रेमीच्या गळ्यातील ताईत आहे. क्रिकेटच्या शिरपेचातील मनस्वी  राजाला आमच्या विश्वविक्रमी पोट्रेटने  मानवंदना!
बुद्धीबळाच्या पटावर विश्वविक्रम ! बुद्धीबळाच्या पटावर विश्वविक्रम ! Reviewed by News1 Marathi on July 08, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads