वर्षा जलसंचयनाबाबत नवे धोरण राबवा
न्यूज१ मराठी । नेटवर्क
आयुक्त संजीव जयस्वाल यांचे शहर विकास विभागाला आदेश
वर्षा जलसंचयन ही व्यापक चळवळ बनावी, जास्तीत जास्त लोकांनी जागरूक होऊन त्याची अंमलबजावणी करावी, यासाठी जुन्या इमारतींबरोबरच नवीन विकास प्रस्तावांना मंजुरी देताना वर्षा जलसंचयनबाबत नवीन धोरण बनविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. याबाबत या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून शहर विकास विभागाने त्याचा मसुदा तयार करण्याचे आदेश त्यांनी शहर विकास विभागाला दिले.
सद्य:स्थितीत पाणी प्रश्नाचे गांभीर्य वाढत चालले आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न बिकट होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यामध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी वर्षा जलसंचयनच्या माध्यमातून हे पाणी अडविल्यास निश्चितपणे जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात जुन्या इमारतींमध्ये ही योजना कशी राबविता येईल, त्यासाठी काय अतिरिक्त सुविधा देता येतील त्याचबरोबर नवीन विकास प्रस्तावांना मंजुरी देताना काय सुविधा देता येतील याबाबत काय करता येईल याबाबत धोरण बनविण्यात येणार आहे. याबाबत वर्षा जलसंचयन क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करून याचा प्राथमिक मसुदा तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
वर्षा जलसंचयनाबाबत नवे धोरण राबवा
Reviewed by News1 Marathi
on
July 05, 2019
Rating:
Post a Comment