Header AD

मराठी ग्रंथसंग्रहालयात सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शौर्य दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि स्वा वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी  सुप्रसिध्द चित्रकार सुहास बहुलकर यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या स्वा. बॅ. वि. दा सावरकर यांच्या भव्य तैलचित्राचे अनावरण आणि केंद्रीय अर्थसंकल्प 2019-20 वर व्याख्यान मराठी ग्रंथ संग्रहालयात आयोजित करण्यात आले  आहे.

 मराठी ग्रंथसंग्रहालयात सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण


राष्ट्रीय सावरकर स्मारक, दादर, मुंबई या संस्थेचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांच्या हस्ते तैलचित्रांचे अनावरण होणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सावरकर स्मारक, दादर, मुंबई या संस्थेच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे हे या तैलचित्र अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. मराठी ग्रंथ संग्रहालयात 1 ला मजला, वा. अ. रेगे सभागृह, सरस्वती मंदिर, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे(प) येथे रविवारी 7 जुलै रोजी सायंकाळी 6.00 वाजता येथे हे दोन्ही कार्यक्रम संपन्न होणार आहेत. 

मराठी ग्रंथसंग्रहालयात सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण  मराठी ग्रंथसंग्रहालयात सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२७ रुग्ण तर दोन मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात   आज   २२७    कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून     गेल्या २४ ता...

Post AD

home ads