Header AD

वायरवर चालणारा फोन जेव्हा बिनवायरीचा झाला

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

बिनचेहर्याचे आंदोलन

वायरवर चालणारा फोन जेव्हा बिनवायरीचा झाला आणि हातात आला तेव्हापासून घडलेली ही मोबाईल क्रांती आता खुप वेगाने पुढे गेली आहे. ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इंस्टाग्राम...या मार्गांचा उपयोग आता आंदोलनासाठी ह्या मार्गाचा उपयोग जगभर होऊ लागलाय.
मराठा आरक्षणांसाठी काढण्यात आलेले मराठा मोर्चे काही गोष्टींसाठी चर्चिले गेले. एक म्हणजे या मोर्चांमध्ये असणारा लाखोंचा सहभाग आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोर्चाला कोणत्याही राजकीय पुढार्‍यांचा चेहरा नसणं. हाँगकाँगमध्ये सध्या सुरू असलेली आंदोलनंही अशाच प्रकारे होत आहेत. या आंदोलनाला कोणीही नेता नाही पण तरीही मोठ्या संख्येने यात लोक सहभागी होत आहेत.
हाँगकाँगमधल्या एका कॉम्प्लेक्समध्ये साध्याशा इमारतीच्या लहानशा खोलीमध्ये असणारी एक व्यक्ती हाँगकाँगमध्ये सध्या सुरू असणार्‍या आंदोलनांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतेय. लॅपटॉप पुढ्यात घेऊन बसलेला टोनी हा टेलिग्राम हे खासगी मेसेजिंग ऍप आणि इतर ऑनलाईन फोरम्सवरील अनेक ग्रुप्समधील मेसेजेसवर लक्ष ठेवून आहे. टोनीसारखे अनेक कार्यकर्ते हे शेकडो टेलिग्राम ग्रुप्स चालवतात आणि त्यातूनच हाँगकाँगमधील प्रत्यार्पण विधेयकाला विरोध करणारी आणि सरकारविरोधातली असहकार करणारी चळवळ उभी राहिली असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. तब्बल 20 लाखांपेक्षा जास्त लोक गेल्या काही आठवड्यांमध्ये या वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरोधात रस्त्यावर उतरल्याचा त्यांचा दावा आहे.
या प्रस्तावित विधेयकाच्या विरोधामध्ये हाँगकाँगमध्ये आतापर्यंत अनेक रॅलीज झाल्या. या विधेयकामुळे हाँगकाँगचं न्यायिक स्वातंत्र्य धोक्यात येण्याची भीती आहे. आजच्याच दिवशी हाँगकाँगचं चीनला हस्तांतरण करण्यात आलं होतं. हाँगकाँगचे शहर प्रमुख कॅरी लाम या आज झेंडावंदनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या प्रत्यार्पण विधेयकाच्या मुद्द्यावरून आंदोलक कॅरी लाम यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या कार्यक्रम स्थळी निदर्शनं करणार्‍या लोकांवर पोलिसांनी लाठी चार्ज केला आणि पेपर स्प्रेचाही वापर करण्यात आला.
एनक्रिप्टेड मेसेजिंग प्सवर आंदोलकांना आवाहनं केली जातात. यासाठी या प्सवरील मेसेजिंग बोर्ड्स आणि ग्रुप चॅट्सचा वापर केला जातो. यातल्या काही ग्रुप्समध्ये तर तब्बल 70,000 क्टिव्ह सबस्क्रायबर्स असून ही संख्या हाँगकाँगच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 1 टक्क्याएवढी आहे. यातले अनेक जण आंदोलनांच्या बाबतीतले अपडेट्स आणि घटना स्थळाची प्रत्यक्ष स्थिती या विषयीची माहिती देतात. तर इतर जण पोलिसांवर लक्ष ठेवणं, आंदोलकांना जवळपास होणार्‍या घडामोडींबद्दल सावध करणं यासारख्या गोष्टी करतात.
याशिवाय वकील, प्रथमोपचार देणारे आणि डॉक्टर्स यांनीही प्सवर लहान ग्रुप्स तयार केलेले आहेत. हे गट कायदेशीर सल्ला देणं आणि आंदोलनाच्या पहिल्या फळीला सामान पुरवण्याचं काम करतात.
आंदोलनांचं संयोजन करताना ऑनलाईन माध्यमांचा वापर करणं हे सोपं असून त्यामुळे तात्काळ माहिती पाठवता येत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. या चॅट ग्रुप्समध्ये असणार्‍यांना त्यावेळी मतदानही करता येतं. या मतदानाच्या मदतीने पुढचं पाऊल ठरवण्यात येतं.कमी पर्याय असले किंवा संभाव्य पर्याय स्पष्ट असतील तर याचा फायदा होतो. 21 जूनच्या संध्याकाळी हाँगकाँगच्या पोलीस मुख्यालयासमोरचं आंदोलन चालू ठेवायचं की संध्याकाळी घरी परतायचं हे ठरवण्यासाठी जवळपास 4000 लोकांनी टेलिग्रामवरच्या ग्रुपमध्ये मतदान केलं. फक्त 39टक्के जणांनी पोलीस मुख्यालयाजवळच थांबायचं ठरवलं, पण त्यातूनही या इमारतीजवळ 6 तासांचं ओलिस नाट्य घडलं. आंदोलकांना त्यांच्या हालचालींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी इतर ऍप्स आणि सेवांचीही मदत झालेली आहे. येऊ घातलेल्या इव्हेंट्सची माहिती पोस्टर्स आणि बॅनर्सद्वारे सार्वजनिक ठिकाणी एअरड्रॉप (-ळीवीेि) या सेवेद्वारे दिली जाते. याच्या मदतीने लोकांना जवळच्या आयफोन्स आणि आयपॅड्ससोबत फाईल्स शेअर करता येतात.
या आठवड्यात आंदोलकांच्या एका निनावी गटाने क्राऊडफंडिंग वेबसाईटवर पाच लाख डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभा केला. ॠ20 समिटमध्ये हाँगकाँगच्या या प्रत्यार्पण विधेयकावर चर्चा व्हावी असं आवाहन करणार्‍या जाहिराती आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांत या निधीतून छापण्याचा त्यांचा इरादा होता. टेक्नॉलॉजीमुळे हे आंदोलन ’लीडरलेस’ म्हणजेच नेत्याशिवाय झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे
 सरकारविषयी असलेला अविश्वास हे यामागचं कारण आहे. अम्ब्रेला मूव्हमेंटमधल्या अनेक आंदोलक नेत्यांना पकडून, त्यांच्यावर खटला चालवून त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. 2014मध्ये हाँगकाँगमध्ये झालेल्या आंदोलनांना अम्ब्रेला मूव्हमेंट म्हणण्यात येतं. त्या आंदोलनांमध्ये सहभागी असणार्‍या 9 नेत्यांना सार्वजनिक अडथळा निर्माण करण्यासाठी इतरांना प्रोत्साहन दिल्याच्या गुन्ह्यामध्ये यावर्षीच्या एप्रिलमध्ये दोषी ठरवण्यात आलं. जर उघडपणे एखादा मोर्चा किंवा आंदोलनाचं आयोजन केलं तर तुमच्यावर अनेक आरोप लावले जाऊ शकतात. आपण करत असलेल्या कामांचा ऑनलाईनही मागोवा राहू नये (डिजिटल फुटप्रिंट) याची हाँगकाँगमधले आंदोलक काटेकोरपणे काळजी घेतात. यावेळी रोख व्यवहार केला जातो , आंदोलनांच्या दरम्यान अगदी एटीएमचा वापर करणंही टाळल जात. या आंदोलनात सहभागी होताना दरवेळी  जुना मोबाईल फोन आणि नवीन सिम कार्ड वापरले जाते. आपला ऑनलाईन मागोवा राहू नये म्हणून अनेक लोक अनेक वेगवेगळे अकाऊंट्स वापरत असल्याचं. पैकी काहींकडे तीन-चार फोन्स आहेत, आयपॅड, डेस्कटॉप आणि नोटबुक्सही आहेत. एका व्यक्तीचे पाच ते सहा अकाऊंट्स असू शकतात. ही तीच लोकं आहेत हे कोणाला कळू शकत नाही, शिवाय अनेक लोकं मिळून एकच अकाऊंटही वापरतात.
ग्रुप्समधल्या मतदानातून निर्णय घेण्यात आल्याने कोणा एका व्यक्तीवर त्याचा ठपका लागत नाही. या चॅट ग्रुपचं काम पाहणार्‍या डमिनिस्ट्रेटर्सचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून या ग्रुपमध्ये कोण काय पोस्ट करतं यावर त्यांचे निर्बंध नाही. या आंदोलनातल्या प्रत्येक व्यक्तीला सरकार अटक करू शकत नाही. त्यांना असं करणं परवडणार नाही. पण सरकार याचा वचपा दुसर्‍या पद्धतीने काढण्याची भीती आहे. एका टेलिग्राम ग्रुपच्या डमिनिस्ट्रेटरला अटक करण्यात आली. हाँगकाँगमधल्या सरकारी इमारतींमध्ये घुसण्याचा आणि त्या परिसरातले रस्ते रोखण्यासाठीचा कट रचण्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. इंटरनेटवर जरी लपलात तरी आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला अटक करू शकतो असं त्यांना दाखवून द्यायचंय.पचा असाही आंदोलनासाठी उपयोग करण्याची कल्पकता बंदीतुन मार्ग काढते हे खरय.
वायरवर चालणारा फोन जेव्हा बिनवायरीचा झाला वायरवर चालणारा फोन जेव्हा बिनवायरीचा झाला Reviewed by Maharashtradinman on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads