ग्रामीण भागातील आरोग्याची धुरा आरोग्य विभागाच्या खांद्यावर
न्यूज१ मराठी । नेटवर्क
पावसाळ्याच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात साथीच्या व जलजन्य आजारांचा फैलाव होवू नये, याकरीता ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. तसेच ग्रामीण भागात साथरोगाचा उद्रेक होवू नये यासाठी खबरदारीची उपापयोजना म्हणून वैद्यकीय अधिकार्यांचे पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरीकांच्या आरोग्याची धुरा जिल्हा आरोग्य विभागाच्या खांद्यावर असते. त्यात पावसाळाच्या काळात ग्रामीण भागात साथीच्या आजारांच्या फैलाव होवू नये याकरीता, मुख्यकार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बा.भी.नेमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे यांनी पाच तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतींना सर्व गटविकास अधिकार्यांना पावसाळ्याच्या काळात आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या व कुठेही जलजन्य आजाराची साथ पसरु नये याकरीता सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या.
पाच तालुक्यातील 33 प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात आला आहे. आशा स्वयंसेविकांमार्फत क्लोरिनच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण भागात साथींच्या आजारांचा फैलाव होवू नये यासाठी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय सहाय्यक आरोग्य अधिकारी आणि साथरोग नियंत्रण आरोग्य अधिकरी आदींचे तीन पथके तैनात देखिल करण्यात आले आहे. तसेच जिल्हा स्तरावर शिघ्र प्रतिसाद पथकाची स्थापना देखिल करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील आरोग्याची धुरा आरोग्य विभागाच्या खांद्यावर
Reviewed by News1 Marathi
on
July 06, 2019
Rating:
Post a Comment