Header AD

ठाणे परिसरात मुसळधार पाऊस न्यूज१ मराठी । नेटवर्क 

मासुंदा तलाव ‘ओव्हर फ्लो’ । रस्त्यावर पाणीच पाणी

शनिवारी सकाळपासूनच पावसाने ठाणे आणि परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे मासुंदा तलावातील पाणी बाजूच्या रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.श्चश्चठाण्यात पावसाची जोरदार हजेरी; मासुंदा तलावातील पाणी आले रस्त्यावरनाले सफाई नीट न झाल्यामुळे पाणी रस्त्यावर साचत आहे. तसेच सखोल भाग असल्यामुळे या ठिकाणी सक्षम पंप लावणे गरजेचे आहे. परंतु त्यासंदर्भातील दखल पालिकेने घेतली नसल्यामुळे या भागात दरवर्षीप्रमाणे आताही पाणी साचले आहे. त्यामुळे याचा फटका स्थानिकांसह वाहनचालकांना बसत आहे. ठाणे परिसराला पावसाने शनिवारी चांगलेच झोडपले  ठाण्यातील मासुंदा तलाव पावसाच्या पाण्याने भरून ओसंडून वाहत आहे. यामुळे तलाव परिसरातील रस्त्यावर पाणी साचले आहे. ठाण्याच्या रस्त्यावर साचलेले पाणीमागील दोन दिवसांपासून सतत पडणार्‍या पावसाने ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या परिसरात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना फटका बसत असून वाहने धीम्या गतीने जाताना दिसत आहे. या भागात लहान नाले व्यवस्थित साफ न केल्यामुळे अशा सखोल भागात पाणी साचत आहे. ठाण्यात जवळपास 34 सखोल भागात पाणी साचत आहे. पावसाने जर जोर धरला तर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकते. ठाण्यात चोविस तासांत 237.49 मीमी पाऊस पडला असून एकूण कालपर्यंत 600 मिली पावसाची नोंद झाली आहे.

ठाणे परिसरात मुसळधार पाऊस

शहरात मुसळधार झालेल्या पावसामुळे 39 ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या दुर्घटनेत अंबरनाथमध्ये 1 जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. विष्णू सोळंकी असे मृताचे नाव आहे. झाडासोबत वीजेचे खांब कोसळल्याने रिक्षाचालक ठार झालाय. पहिली घटना अंबरनाथमधील शिवाजी चौकातील रिक्षा स्टँडजवळ घडली. याठिकाणी मोठ्या झाडासोबत विजेचा खांबही कोसळला. त्यामुळे तुटलेल्या विजेच्या तारांमधून वीजप्रवाह रिक्षावर उतरल्याने रिक्षाचालक सोळंकीचा मृत्यू झाला. तर त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांनाही विजेचा शॉक लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींवर उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोळंकी यांचा मृतदेह सकाळी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसर्‍या घटनेत झाड इमारतीवर कोसळली आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, पोलीस, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत.

ठाणे परिसरात मुसळधार पाऊस ठाणे परिसरात मुसळधार पाऊस Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads