Header AD

 न्यूज१ मराठी । नेटवर्क 

घोडबंदर रोडवरील सिग्नलला उभ्या असलेल्या रिक्षाला एका नियंत्रण सुटलेल्या ट्रकची ठोकर बसून रिक्षा थेट टीएमटी बसवर धडकल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.या अपघातात रिक्षाचालकासह रिक्षात बसलेले दिव्यांग प्रवाशी जखमी झाले आहेत.अपघातानंतर ट्रक चालकाने धूम ठोकली.याप्रकरणी,कासारवडवली पोलीस ठाण्यात ट्रक चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहिसर पूर्वेकडे राहणारे दिव्यांग मोहम्मद तैयब चौधरी (52) हे शुक्रवारी लहान भाऊ मोह.युनूस चौधरी यांच्यासह मित्राच्या रिक्षाने तळोजा येथील नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते.तेथून घरी परतत असताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडवरील नागला बंदर येथील सिग्नलवर रिक्षा उभी होती.तेव्हा,पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने सिग्नलवर उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून ठोकर बसल्याने रिक्षा थेट समोरील टीएमटी बसवर धडकली.यात रिक्षा पूर्णपणे चेपून गेली असून रिक्षाचालक आणि दोघेही चौधरी बंधू जखमी झाले.या घटनेनंतर ट्रकचालक पसार झाला असून जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.अशी माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

Ganesh Deshmukh Saheb Happy Birthday

 

Post AD

home ads