Header AD

काश्मीर व गृहमंत्री

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

अमित शहा नावाच्या गृहमंत्र्याला संसदेत काश्मीर प्रश्नावर पोटतिडिकेने बोलताना पाहून मनस्वी समाधान झाले. आतापर्यंतच्या संसदकार्य इतिहासात काँग्रेसचे तोंड असे कोणीच बंद करताना पाहिले नव्हते. त्यांच्या तोंडावर नेहरूंची चूक फेकताना सोनिया राहूलचे चेहरे पाहण्यालायक होते. बाकी काँग्रेसमध्ये तसा संसदपटू आता उरलाही नाही. त्यामुळे मुद्देसूद बोलण्यासारखे त्यांच्याकडे नव्हतेच काही. असो. हे फारच बरे झाले की अमित शहांनी आपली कारकीर्द सरळ सरळ काश्मीर प्रश्नास हात घालून केली. त्यात त्यांना आता यशही मिळेल.

काश्मीर व गृहमंत्री

आजपर्यंत ह्या विषयावर चर्चा देखील होऊ दिली जात नव्हती. त्यात पुरोगामी मीडियाची त्यांना छुपी साथ. त्यामुळे नवीन पिढ्यांना काश्मीरात नक्की काय शिजलं होतं हे कळतच नव्हते. रेसिपी बिघडवणारा आचारी कोण होता? हेही समजत नव्हते. अमित शहांनी नेहरूंवर थेट शरसंधान करून वाट मोकळी करून दिली हे उत्तम....
देशाचे विभाजन ठरल्यानुसार झाल्यानंतरही नेहरू नं खेळलेली ही दुष्ट खेळी... त्यात इंग्रजांनी त्यांना साथ दिली... जिना नी सैन्य पाठवून काश्मीरचा भूभाग बळकावला... भारतीय सैन्य लढून तो सगळा भूभाग परत मिळवणारच होते... तेवढ्यात सरदार पटेलांना अंधारात ठेवून नेहरुंनी आपल्याकडून युद्धबंदी जाहीर केली. सैन्याचा घोर अपमान/मानहानी केली. नेहरू असं का वागले... हीच त्यांची हिमालयाइतकी चूक... जी त्यांनी जाणीवपूर्वक केली. वरती त्यात भर घातली ती हा प्रश्न युनोत नेऊन! 
हे कशासाठी? का?.... ह्या प्रश्नातच आपल्याच पुढार्‍यांनी देशाशी व हिंदूंशी केलेली बेईमानी ठळकपणे दिसून येते... नंतर पद्धतशीरपणे काश्मीरातून हिंदू शिरकाण करून पाच लाख हिंदू अलिकडे निर्वासित केले इथपर्यंतचं पाप हे नेहरूंचच. हे अमित शहांनी ठणकावून सांगितलं. ऐकून मनाला खूपच शांत व समाधान स्पर्शून गेलं. ज्यासाठी जनतेनं त्यांना बहुमत दिलंय ते काम ते चोखपणे पार पाडताना दिसून येतंयं हे अभिमानास्पद आहे. देशात संविधानाच नाव घेऊन, देशाची दिशाभूल करत केवळ मुस्लिमांना झुकतं माप का देत राहिले याचं उत्तर काँग्रेसनं जरी नाही दिलं तरीही जनतेने ते मतपेटीतून दिलेलं आहे.. कटु वाटलं तरी स्विकारण्याशिवाय गत्यंतर नाही. पुढील पाच वर्षात सत्तेपासून दूर राहण्याची शिक्षा काँग्रेस/राष्ट्रवादीला नागरिकांनी सुनावली ती यासाठीच. किळस येण्याइतकं लांगूनचालन केलंय या सगळ्यांनी.... अशाही परिस्थितीत भाजपनं मुस्लिम समुदायाच्या उन्नतीसाठी धोरणं खर्‍या अर्थाने राबवणार असल्याचं जाहीर करून काँग्रेसला जबर चपराक लगावली आहे. त्यांच्यात देशाबद्दल आत्मियता निर्माण करता येऊ शकते; त्यांच्या उत्थानासाठी योग्य ती धोरणं राबवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला जाऊ शकतो हे सरकारनं दाखवून दिलय. आज मुस्लिम समाजातील शिक्षित वर्ग अभ्यासपूर्ण चिकित्सा करतोय सरकारची. त्यांना कळून चुकलय की काँग्रेसनं त्याना वापरून घेतलं. त्यांचं भलं होऊ दिलच नाही... ही खरी गोम आहे. सत्तेसाठी त्यांना हिदूंविरूद्ध सतत पेटतं ठेवून नेहरू परिवारानं आपली रोटी भाजून घेतली . मागच्या दहा वर्षात ह्या कुटुंबानं भारताची अक्षरश: लूट केली. ती कधीही न भरून येणारी असून त्यातील पै न् पै ही देशातल्या नागरिकांची आहे. हे कुटूंब देशाच्या मानगुटीवरून मागेच उतरवले असते तर आतापर्यंत देश महासत्तेच्या जवळपास पोहोचला असता. असो. 

सावरकर विचारधारेच्या चाणक्यानं काल संसदेत आपला मनसुबा जाहीर करून दणका दिलाच आहे ... बंगाल मध्ये ममता आता बॅकफूटवर आहे... काश्मीरात मेहबूबा..... मेहबूबा मेहबूबा हे शोलेचं गाणं गात बसलीय..... वायनाड केरळात राहूल च्या शोभायात्रेत आता पाक झेंडे दिसले नाहीत.... देशद्रोहाचा खटला होईल या भितीनं का होईना त्याला पायबंद बसला हेही नसे थोडके. गृहमंत्री असावा तर असा... देशविघातक शक्तिंच्या मनात दहशत भरणारा.. व्वा...! 

जयहिंद...
काश्मीर व गृहमंत्री काश्मीर व गृहमंत्री Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads