Header AD

सी.ए संस्थेचा सत्तरावा स्थापना दिन न्यूज१ मराठी । नेटवर्क 

सी.ए. संस्थेचा(चार्टड अकाउंटंट) ठाणे शाखेचा सत्तरावा स्थापना दिवस रविवार 30 जून 2019 रोजी सायंकाळी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात विविध कार्यक्रमांतून आणि उपक्रमातून साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत. सी.ए. संस्थेचे अनेक सदस्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. ’सुरसंगम’ या संगीतमय मैफिलीचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. सी.ए. संस्थेचे विविध सदस्य आपले कलाविष्कार सादर करणार आहेत. 

 यामध्ये गायन, नृत्य, संगीत, एकांकिका इत्यादींचा समावेश आहे. गेले आठवडाभर विविध उपक्रमातून स्थापना दिवस साजरा केला जात आहे. कर्मवीर भाऊराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना चार्टड अकाउंटंट (सी.ए.) होण्यासाठी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. जोशी-बेडेकर कला-वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांसाठी जी.एस.टी विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. इंन्स्टीटयुट आँफ चार्टड अकाउंटंटस् ऑफ इंडिया चे केंद्रीय अध्यक्ष सी.ए. प्रफुल्ल छाजेड असून ठाणे शाखेचे अध्यक्ष सी.ए.प्रा. योगेश प्रसादे आहेत. सी.ए. राहुल घरत सेक्रेटरी असून सी.ए. चेतन छाडवा खजिनदार आहेत. उपाध्यक्ष म्हणून सी.ए. सुरेन ठाकूर-देसाई आहेत तर स्टुडेंट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून सी.ए. स्वप्नील कोलते आहेत. तसेच सी ए रजनीश शर्मा व सी ए शिवभगवान असावा हे व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत व शाखेचे प्रतिनिधी सी ए कमलेश साबू आहेत.

सी.ए संस्थेचा सत्तरावा स्थापना दिन सी.ए संस्थेचा सत्तरावा स्थापना दिन Reviewed by News1 Marathi on July 01, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप'

मुंबई, ५ मार्च २०२१ :  सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WO...

Post AD

home ads