Header AD

चारित्र्याच्या संशयातून पतीनेच केली हत्या

  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

करोटीया ह्याच्याशी लग्न केले होते. सनमचा पती सचिन हा उल्हासनगर येथील स-हाईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो काही दिवसांपूर्वी सुटुन आला होता. त्याला माहित पडले की, सनमचे अन्य कोणासोबत प्रेमसंबंध सुरु आहे. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला.  त्यामुळे सनम ही काही दिवसापूर्वी सचिन याला सोडून ढकणी याच्यासोबत राहत होती. शुक्रवारी सचिन यांचा भाऊ पंकज याची कोर्टात केस होती. त्याकामासाठी हे दोघे तेथे आले होते. त्यानंतर  कल्याणच्या एपीएमसी मार्केटबाहेर गाडीवर आलेल्या सनमवर चाकू हल्ला केला. जखमी सनमला खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

चारित्र्याच्या संशयातून पतीनेच केली हत्या

सीसीटिव्हीत संपूर्ण घटना कैद होती मात्र, सीसीटिव्हीतील दृश्य स्पष्ट नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याप्रकरणी पोलिसांनी करण उर्फ बाबू ढकणी याला संशयी म्हणून ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिसांना बाबूवर संशय होता कारण बाबू आणि सनममध्ये प्रेमसंबंध सुरु होते.  मात्र, पोलिसांचा तपास जसाजसा पुढे गेला तसतसे या घटनेने वेगळेच वळण घेतले. याप्रकरणी पोलिसांनी सनमचा पती सचिन करोटीया यानेच हत्या केल्याचे उघड झाले. त्यात सचिन करोटीया आणि बाईक चालवणारा सहकारी दिपक ठाकुर याला देखील अटक केली आहे. दरम्यान या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 
चारित्र्याच्या संशयातून पतीनेच केली हत्या चारित्र्याच्या संशयातून पतीनेच केली हत्या Reviewed by News1 Marathi on July 08, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत १५५१ रुग्ण तर ७ मृत्यू २०२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली   महानगर पालिका   क्षेत्रा त   आज   १५५१  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ त...

Post AD

home ads