Header AD

पावसाचा हैदोस  न्यूज१ मराठी । नेटवर्क 

दुर्गाडी किल्ल्यासमोर असलेल्या नॅशनल ऊर्दू स्कुलची संरक्षक भिंत मंगळवारी मध्यरात्री घरावर कोसळून यात तीन जणांचा मुत्यू तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना कल्याणात घडली. गेल्या तीन दिवासांपासून सतत सुरू असलेल्या पावासात क प्रभागाक्षेत्रातील रामबाग येथील फातिमा मंजिल इमारतीचा धोकादायक भाग दुपारी कोसळल्याने आपतकालीन यंत्रणेने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कामासह धोकादायक इमारत पाडण्याचे काम सुरू केले असतानाच मंगळवारी क प्रभाग क्षेत्रातील दुर्गाडी किल्ल्या समोरील नॅशनल ऊर्दू स्कूलची संरक्षक भिंत मध्य रात्री 12.30 वा. सुमारास बाजुच्या घरावर कोसळल्याने तीन जणाचा मुत्यु झाल्याची घटना घडली. शोभा काबंळे (60), करीमा हुसेन महंमद वय अंदाजे 30 वर्ष, हुसेन चांद 3 वर्ष हे मृत पावले. तर आरती राजु कर्डीले वय 15 वर्षे जखमी झाल्याने तिला उपाचारार्थ रुक्मिणी बाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान व आपातकालीन कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घरावर कोसळलेल्या सरंक्षक भितींचा ढिगारा हटविला.

पावसाचा हैदोस

दुर्गाडी किल्ला, तालुका-कल्याण येथे भिंत पडून 3 जण मृत व 1 जण जखमी, ठाणे महानगर पालिका हद्दीत नौपाडा, चिखलवाडी, भास्कर कॉलनी परिसरात 25 जण पाण्यात अडकले होतेे त्यांना ठाणे म.न.पा. आपत्ती व्यवस्थापन टीमने सुखरूप बाहेर काढले. अभिनय कट्टा पाण्यात कलागुणांना वावदेणार अभिनय कट्टा आज पाण्याखाली गेला, खूप पुस्तकांचे नुकसान झाले, साहित्य, आभिनयाचे सामान भिजून नुकसान झाले.
पावसाचा हैदोस पावसाचा हैदोस Reviewed by News1 Marathi on July 04, 2019 Rating: 5

No comments

Featured Post

महिला दिना निमित्त मुंबई ते खंडाळ्या दरम्यान ऑल - वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन

■मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील एचपीसीएलच्या नवीन चार्जिंग स्टेशनला दिली भेट ... मुंबई, ८ मार्च २०२१ :  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एमजी मो...

Post AD

home ads