डोंबिवलीत वृंदावन इमारतीचा भाग कोसळला
न्यूज१ मराठी । नेटवर्क
30 वर्षांपूर्वीच्या सर्व इमारतींचा सर्वे पालिका प्रशासनाकडून सुरू असून अशा इमारतींना नोटीसा बजावण्यात येत आहे. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनसमोर सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गंगाराम म्हात्रे (वृंदावन) धोकादायक इमारतीचा भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या इमारतीसमोर प्रचंड रहदारी असते. पालिकेने ही इमारत धोकादायक असल्याने रिकामी केली होती.
या इमातीच्या तळ मजल्यावर वृंदावन हॉटेलसह 8 दुकानाचे गाळे आहेत. तसेच डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणार्या कोपर पुलावर जाण्यासाठी वाहनचालक सदर इमारतीच्या समोरील रस्त्यावरून जात असतात. हॉटेल आणि गाळे असल्यानेही नागरीक येत असल्याने त्यांच्याही जीवितास धोका होऊ शकतो असे दिसते. याबाबत ग प्रभागाचे क्षेत्र अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी सांगितले की 15 जून रोजी या इमारतीच्या मालकाला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. तसेचग प्रभागातील 37 इमारतींच्या मालकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस देण्यात आली आहे. डोंबिवली औद्योगिक विभागात भारत संचार निगमच्या पाठीमागच्या बाजूची इमारत असून वाणिज्य विभागाच्या इमारतीच्या भिंतीला तडे गेल्याने इमारत रिकामी करण्यात आली. मुख्य दर्शनी इमारतीत कार्यालय हलवण्यात आले. सध्या ही इमारत धोकादायक असल्याने रिकामी करण्यात आली. पेंढारकर महाविद्यालयाच्या लगत भिंत असून त्या भिंतीलाही तडे गेले आहेत. या संदर्भात कर्मचारी अधिकृत बोलण्यास तयार नसले तरी इमारत धोकादायक असल्याने रिकामी करण्यात आल्याचे संगितले. आता सर्व कार्यालय मुख्य दर्शनी इमारतीत हलवण्यात आल्याचे कर्मचारी सांगतात.

Reviewed by News1 Marathi
on
July 04, 2019
Rating:

Post a Comment