ढोल बजाओ, सरकार को जगाओ
न्यूज१ मराठी । नेटवर्क
देशात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून दिवसेंदिवस कंपन्या बंद होत असल्याने अनेकांचे रोजगार हातातून निसटू लागले आहेत. त्या निषेधार्थ सोमवारी ठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ असा नारा देत ढोल ताशांचा गजर करण्यात आला. दरम्यान, कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही ठाण्यात ढोल वाजवले असले तरी वर्षावरही ढोल वाजवायला मागे हटणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला.
भाजप सरकारच्या कार्यकाळात केवळ महाराष्ट्रातच जवळपास एक लाख 42 हजार कंपन्या बंद झाल्याने लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले तरीही हे सरकार कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होत नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे- नवी मुंबई प्रभारी अभिषेक बोके, ठाणे शहराध्यक्ष मोहसीन शेख, कार्याध्यक्ष संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर ढोल ताशांचा गजर करण्यात आला.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, सामाजिक न्याय विभागाचे ठाणे अध्यक्ष कैलास हावळे, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, प्रदेश कार्यकारीणी सदस्य हैदर शेख, रवींद्र पालव, राहुल सिंग, दीपक पाटील, सुधीर शिरसाठ, अनिकेत चोरमले, सिद्धांत वटकर, करणा पाटील, संतोष मोरे, अजय मिश्रा, रोहित भंडारी, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने वाजवले ढोल

Reviewed by News1 Marathi
on
July 09, 2019
Rating:

Post a Comment